10.5 C
New York
Saturday, November 9, 2024

Buy now

spot_img
spot_img

मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी मराठा सेवक युवा नेते मा.स्वप्निल भैय्या गलधर यांना बीड विधान सभेची उमेदवारी जाहीर करावी : उमेश थोरात

बीड, महाराष्ट्र आरंभ वृत्त : महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना भारतीय जनता पार्टी बीड तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा मराठा आरक्षणासाठी व मराठा समाजाच्या होत असलेल्या आत्महत्या या कारणामुळे तालुकाध्यक्ष पदाचा तडकाफडकी राजीनामा देऊन भाजपला रामराम ठोकणारे जिल्ह्यातील पहिले युवक नेतृत्व स्वप्निल भैय्या गलधर हे होते गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षण चळवळीमध्ये व मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये सहभागी असताना आपण सर्वांनी पाहिले आहे. आरक्षणासाठी भारतीय जनता पार्टी मध्ये राहून न्याय मिळत नसल्यामुळे भाजपला रामराम ठोकून गेली एक वर्षांपासून मनोज दादा जरांगे पाटलांन बरोबर प्रत्येक आंदोलनामध्ये सामील होऊन स्व :ता सर्व जिम्मेदारी घेऊन वेळप्रसंगी अनेकांना अंगावर ही घेतले आहे अश्या या युवकाला मनोज दादा जरांगे पाटील यांनी उमेदवारी देऊन तरूण नेतृत्वाला बीड विधानसभेमध्ये नेतृत्व करण्याची संधी द्यावी अशी ईच्छा बीड मतदार संघातील सर्व सामान्य जनतेची आहे. बीड मतदार संघामध्ये मनोज दादा जरांगे पाटलांनी मा.स्वप्निल भैय्या गलधर यांच्या सारख्या तरून तडफदार चेहर्‍याला आमदारकीची संधी दिलीतर भैय्याला आमदार करण्यासाठी बीड मतदार संघामध्ये सक्रिय राहिल असे आव्हान उमेश थोरात व स्व. अमोल भैय्या गलधर युवा मंच महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या