27.5 C
New York
Tuesday, June 18, 2024

Buy now

◼️पाच हजार रुपयाची लाच स्वीकारताना चकलांबा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

◼️छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

गेवराई प्रतिनिधी,(नवनाथ आडे):- शेतीच्या वादातून दाखल करण्यात आलेल्या अदखलपात्र गुन्ह्यात प्रतिबंधात्मक कारवाईमध्ये मदत करण्यासाठी पाच हजार रुपये लाच स्वीकारणाऱ्या पोलीस हवालदाराला छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. पोलीस हवालदार मारुती रघुनाथ केदार (वय-35 रा. चकलांबा, ता गेवराई, जि बीड) असे लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.21) करण्यात आली.

याबाबत 34 वर्षीय व्यक्तीने छत्रपती संभाजीनगर एसीबी कार्यालयात तक्रार दिली आहे. आरोपी पोलीस हवालदार मारुती केदार हे चकलांबा पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. तक्रारदार व त्यांचे चूलते यांच्यात शेतीच्या वादातून भांडण झाले आहे. त्यामुळे चकलांबा पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी अदखल पात्र गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यामध्ये प्रतिबंधक कारवाईमध्ये मदत करण्यासाठी आरोपी पोलीस हवालदार मारुती केदार यांनी पाच हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदार यांनी एसीबी कार्यालयात पोलीस हवालदार केदार पैसे मागत असल्याची तक्रार केली.

छत्रपती संभाजीनगर एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता पोलीस हवालदार केदार यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एसीबीच्या पथकाने सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून पाच हजार रुपये लाच स्वीकारताना पोलीस हवालदार मारुती केदार यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्यावर चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई एसीबी छत्रपती संभाजीनगर परिक्षीत्राचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव, पोलीस उप अधीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयमाला चव्हाण, पोलीस निरीक्षक अमोल धस, पोलीस अंमलदार सिंदकर, युवराज हिवाळे, चालक शिंदे यांच्या पथकाने केली

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या