दप्तर दिरंगाई कायदा 2006 तरतुदीनुसार शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) जिल्हा परिषद,छत्रपती संभाजीनगर यांच्याविरूध्द कार्यवाही करण्यात यावी-शेख अब्दुल रहीम
न्यायासाठी आता थेट राज्याचे मा. शालेय शिक्षण सचिव यांच्याकडे निवेदन सादर!
छत्रपती संभाजीनगर – जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या विरुद्ध दप्तर दिरंगाई कायदा 2006 अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी अशी विनंती राज्याचे शालेय शिक्षण सचिव यांच्याकडे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनचे राज्य प्रवक्ता शेख अब्दुल रहीम यांनी केली आहे. कारण आमच्या संघटनेमार्फत शिक्षण संचालक प्राथमिक, पुणे यांच्या कार्यालयात अनेक निवेदने पुराव्यासह सादर केलेले आहेत परंतु शिक्षण संचालक प्राथमिक यांनी दोन वेळी चौकशीचे आदेश काढले पण त्यात फक्त नावापुरती चौकशी करण्यात आली होती. त्या चौकशीच्या आधारावर फक्त शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना “समज पत्र” देऊन हे प्रकरण बंद करण्यात आले होते तसेच मा.शिक्षणाधिकारी (प्राथमिक)यांच्याविरोधात आजतागायत कोणतीही कठोर कारवाई करण्यात आलेली नसल्याने नाईलाजाने आज आम्ही न्यायासाठी राज्याचे शालेय शिक्षण सचिव मा.श्री. रणजितसिंहजी देओल साहेब यांच्या सेवेत हे निवेदन सादर केलं आहे. निवेदनावर स्वतः लक्ष देऊन संदर्भ क्रमांक 3 नुसार शिक्षणाधिकारी (प्राथमिक), छत्रपती संभाजीनगर यांनी दप्तर दिरंगाई केलेली आहे हे या पत्रावरून सिध्द होत आहे. म्हणून आपण दप्तर दिरंगाई कायदा 2006 च्या तरतुदीनुसार मा.शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी तसेच संदर्भ क्र.1 नुसार शिक्षण संचालक प्राथमिक यांनी शिक्षणाधिकारी (प्राथमिक), छत्रपती संभाजीनगर यांना समज पत्र दिले आहे म्हणून शालेय शिक्षण सचिव यांच्याकडे फक्त न्यायाच्या दृष्टीने निवेदन पुराव्यासह सादर करण्यात आले आहे. आपण स्वतः लक्ष देऊन आमच्या निवेदनाची दखल घेऊन त्वरित न्याय द्यावा व दोषींवर दप्तर दिरंगाई कायदा 2006 च्या तरतुदीनुसार कठोर कारवाई करावी अशी विनंती करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनचे राज्य प्रवक्ता शेख अब्दुल रहीम यांनी राज्याचे शालेय शिक्षण सचिव रणजितसिंहजी देओल साहेब, राज्याचे शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे साहेब तसेच छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांना ही निवेदनाची प्रत देण्यात आली आहे.