5.2 C
New York
Sunday, January 11, 2026

Buy now

spot_img
spot_img

वडवणीत लहुजी शक्ती सेनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन

वडवणीत लहुजी शक्ती सेनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन

 

वडवणी प्रतिनिधी,

गेल्या एक ते दोन वर्षापासून लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाला अ ब क ड मध्ये आरक्षण देण्यात यावं ही भूमिका घेऊन वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलने करत आहेत व व मातंग समाजाचे अनुसूचित जाती आरक्षणामध्ये वर्गीकरण करण्यात यावी तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे आणि बार्टीच्या धरतीवर आर्टी या शैक्षणिक संस्थेची स्थापना करा या व इतर मागण्यासाठी लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे अग्रेसर असतात. तसेच आत्ताच पुणे ते नागपूर पायी यात्रा विष्णू भाऊ कसबे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेली आहे. याच मागण्या संदर्भात समाजाला न्याय मिळावा म्हणून विष्णू भाऊ कसबे यांनी काढलेल्या पायी यात्रेला पाठिंबा देण्यासाठी लहुजी शक्ती सेना वडवणी तालुक्याच्या वतीने आज दिनांक 11 12 2023 रोजी दुपारी एक वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी राजेश भाऊ कांबळे लहुजी शक्ती सेना मराठवाडा संघटक अध्यक्ष, विलास भिसे जिल्हाध्यक्ष लहुजी शक्ती सेना, राजेश अवचार तालुका अध्यक्ष वडवणी लहुजी शक्ती सेना, आदित्य मोठे लहुजी शक्ती सेना जिल्हा उपाध्यक्ष बीड, ऋषिकेश क्षीरसागर तालुका अध्यक्ष अंबाजोगाई, लहुजी मामा कसबे सामाजिक कार्यकर्ते, संघर्ष जोगदंड सामाजिक कार्यकर्ते, आकाश फुणे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. यानंतर तहसीलदार व पोलीस प्रशासनाला निवेदन सादर केले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या