*सागर इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक दिन वेगळ्या पद्धतीने साजरा*
*************************
सिरसदेवी /प्रतिनिधी(शामअडागळे )
गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथील सागर इंग्लिश शाळेमध्ये आज दि.07/2023 रोजी शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .
या निमित्त विद्यार्थ्यांची वेशभूषा, शिक्षकांचा रॅम्पवॉक, शिक्षकांचे सत्कार व त्यांना शाळेतर्फे भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. ‘विविधतेत एकता’ या विषयानुसार विद्यार्थ्यांनी आपल्या वेशभूषेतून आपल्या भारताची एकता दर्शवली. काहींनी देशातील आदर्श व्यक्तिमत्त्वांचे दर्शन घडवले.
या शुभ दिवसाचे औचित्य साधून माता पालकांनी शाळेतील सर्व शिक्षकांना सन्मानित केले. ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ इयत्ता पहिलीच्या वर्गशिक्षिका मा. सोनाली शिंदे मॅडम यांना देण्यात आला.
शिक्षकांसाठी प्रेरक असे भाषण शाळेचे अध्यक्ष मा. श्रीमंतजी सानप सर व शाळेचे सचिव मा. संतोषजी पटाईत सर यांनी केले. प्रातिनिधीक स्वरूपात मा. राधिका मडावी मॅडम व मा. कल्पना मोरे मॅडम या मातापालकांनी भाषण करून शाळेच्या कामाचे कौतुक केले. या सर्व कार्यक्रमासाठी शाळेच्या प्राचार्या मा. प्रीतीजी सवई मॅडम यांचे अनमोल मार्गदर्शन घडले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मा. नेहा माने मॅडम, मा. पल्लवी सानप मॅडम, मा. ज्योती कादे मॅडम व मा. ऐश्वर्या पवार मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.