27.5 C
New York
Monday, June 17, 2024

Buy now

मा.आ.अमरसिह पंडित यांच्या हस्ते सुशी येथे विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा.

माजी आ.अमरसिंह पंडित यांच्या हस्ते सुशी येथे विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा

——————

आज होणाऱ्या लोकार्पण सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित रहा – पं.स.सदस्य परमेश्वर खरात

—————–

गेवराई :

भारत निर्माण राजीव गांधी सेवा केंद्र योजनेअंतर्गत ग्रामपंचायत भवन मौजे सुशी ता.गेवराई येथील इमारतीसह विविध विकास कामांचा माजी आमदार अमरसिंह पंडित साहेब यांच्या शुभहस्ते आज रविवार दि.३ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे. तरी पंचक्रोशीतील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पंचायत समिती सदस्य तथा गटनेते परमेश्वर खरात यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

गेवराई तालुक्यातील सुशी (क) येथे माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली विविध विकास कामे पुर्ण झाले असून मौजे सुशी येथील ग्रामपंचायत भवनच्या इमारतीसह गाव अंतर्गत सिमेंट रस्ते, पेव्हर ब्लॉक, अंडर ग्राऊंड नाल्या, पाणंद रस्ते यासह विविध विकास कामांचा भव्य लोकार्पण सोहळा माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या शुभहस्ते रविवार दि.३ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता संपन्न होत आहे. तर यावेळी विशेष उपस्थिती म्हणून बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मुजिबभाई पठाण, जि.प.सदस्य फुलचंद बोरकर, माजी जि. प. सदस्य डॉ.विजयकुमार घाडगे, पं.स. सदस्य शेख तय्यबभाई, माजी पं.स.सदस्य हिम्मत खरात, प्रा.संजय तळवतकर यांच्या सह पंचक्रोशीतील प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. तरी पंचक्रोशीतील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पंचायत समिती सदस्य तथा गटनेते परमेश्वर खरात, सरपंच शशिकला केरुबा कांबळे, उपसरपंच कविता गजानन मोंढे, ग्रामसेवक राजेंद्र बन यांच्या सह सर्वश्री ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कार्यालय सुशी, कवडगाव, सुशी तांडा यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या