7.1 C
New York
Saturday, November 9, 2024

Buy now

spot_img
spot_img

सिरसदेवी जि.प. शाळेच्या तिसरीच्या वर्गाला शिक्षक द्या. सरपंचांसह ग्रामस्थांची मागणी, केंद्र प्रमुखाचे दुर्लक्ष.

*सिरसदेवी जि.प.शाळेच्या 3 रिच्या वर्गाला शिक्षक द्या सरपंचसह ग्रामस्थची मागणी ,केंद्र प्रमुखाचे दुर्लक्ष*

*************************

 

सिरसदेवी, प्रतिनिधी (शामअडागळे )

गेवराई तालुक्यातील सिरसदेवी गावातील जिल्हा परिषद शाळेला इयत्ता 3 रिच्या वर्गाला शिक्षक नसल्याने विध्यार्थ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे.केंद्रीय प्राथमिक शाळा सिरसदेवी या शाळेत 2023 शैक्षणिक वर्षात शाळेची पटसंख्या एकूण 153 असून या शाळेत इयत्ता 1 ते 5 वी पर्यंत वर्ग असून या शाळेत अध्यपन करण्यासाठी सहशिक्षिकाची सहा पदे असून एकूण 6 पदे कार्यरत आहेत तसेंच किशोर बाबासाहेब घोलप यांच्याकडे मुक्याध्यापक पदभार हा असल्याने यांच्या कडे 3 रिचा वर्ग अध्याप्नासाठी असल्याने इतर कामामुळे त्यांना लक्ष देता येत नसल्याने इयत्ता 3 रिच्या वर्गाला वेळ मिळत नसल्या ने विध्यार्थीचे नुकसान होत आहे.

 

असे असताना जि.प.केंद्रीय प्रमुख यांचे या प्रश्नाकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. तसेच केंद्र प्रमुख चव्हाण हे जसे केंद्र प्रमुखांचा पदभार स्विकारल्यापासून एकदा हि जि. प. शाळा सिरसदेवी कडे आले नाहीत तसेच शाळेतील समश्या काय आहेत याची माहिती हि कधी त्यांनी घेतली नाही त्यामुळे अश्या कामचुकार केंद्र प्रमुखांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सिरसदेवो येथील नागरिक करत आहेत.

 

तसेच विशाल घोलप हे इयत्ता 3 रिच्या वर्गाला शिक्षक म्हणून रुजू झाल्यापासून अध्यपणास अडचणी येत आहेत असे असल्यामुळे शिक्षकांची व मुख्याधयंपाक यांची अडचण दूर करून केंद्रीय प्रा. शा. सिरसदेवीला इयत्ता 3 रिला शिक्षक व शाळेला मुख्यधयंपाक यांची कायमस्वरूपी नियुक्ती करावी यासाठी दि.23/08/2023 रोजी शिक्षण विभाग बीड तसेच पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी यांना सरपंच, गावातील ग्रामस्थ यांच्याकडून निवेदन देण्यात आले आहे. तसेच निवेदनाची दखल न घेतल्यास दि.31 /08/2023 रोजी गटशिक्षणाधिकारी गेवराई यांच्या दालनासमोर शाळा भरवली जाईल असा इशारा सिरसदेवी येथील नागरिकांनी निवेदनद्वारे दिला आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या