बीड- 2019 च्या निवडणुकीत बीडच्या आमदाराने धनुभाऊंच्या मदतीने जे दिवे लावले त्याचे चटके आम्हीण जनता सोसते आहे,गेल्या चार वर्षात काय काय दिवे लावले असल्या आमदाराची विकेट घ्या 2024 मध्ये घरी बसवा अशी टीका युवा नेते डॉ योगेश क्षीरसागर यांनी केली.
बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेत डॉ क्षीरसागर यांनी आपली भूमिका स्पष्ट पणे मांडली.
काही दिवसांपूर्वी आम्ही अजित पवार यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. विकास करायचा असेल तर दादांचे नेतृत्व हवे हा विचार आम्ही केला.बीड शहरातील रस्ते,नाल्या,पाणी,वीज आदि समस्या सोडवायच्या आहेत.अनेक प्रश्न प्रलंबित आहेत
2019 च्या निवडणुकीत बीडच्या आमदाराने प्रकाश सोळंके यांच्याकडून पॅड,अमरसिंह पंडित यांच्याकडून ग्लोव्हज,अजित दादांकडून हेल्मेट अन धनुभाऊंच्या कडून बॅट घेतली अन विजयाचा सिक्सर मारला.पण तेव्हापासून झिंगाट अन बुंगाट झालेले हे आमदार महाशय चार वर्षात कुठेच दिसले नाहीत.येणाऱ्या निवडणुकीत त्यांना झिरोवर आउट करून घरी बसवा अस म्हणत योगेश क्षीरसागर यांनी आ संदिप क्षीरसागर यांच्यावर टीका केली.