17 C
New York
Sunday, September 8, 2024

Buy now

spot_img
spot_img

बाबासाहेबांनंतर अॅड प्रकाश आंबेडकरच गायरान जमीन हक्काचे न्यायाचे आंदोलन करीत आहेत -डॉ.सुरज एरंडे

*बाबासाहेबानंतर ॲड. प्रकाश आंबेडकरच गायरान जमीन हक्क न्यायचे आंदोलन करीत आहेत —डॉ. सुरज एंगडे*

 

*ज्येष्ठ विचारवंत शांताराम बापू पंदेरे यांना सम्यक जीवन गौरव पुरस्कार प्रदान*

 

परभणी :

नवीन भांडवलशाही व्यवस्था जोमात आहे. सरकारच्या निधी धोरणांचा सर्वंकष लाभ त्यांनाच मिळत आहे. सामान्य जनता मात्र विकासापासून कोसो दूर आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत जनतेने फक्त कर भरायचा का ? असा प्रश्न उपस्थित करून सर्वांनी आत्मभान जागे ठेऊन आर्थिक बजेटचा अभ्यास केला पाहिजे असे म्हणत संविधान प्रदत्त प्रगतीच्या वाटेपासून आजही अनेक समूह शोषित, वंचित व दुर्लक्षित आहेत. त्यांच्या हक्कासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात्मक तरतूद केली आहे. बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी 1958-64 भूमिहीन जमीन हक्काचे यशस्वी आंदोलन केले होते. परंतु त्यानंतर फक्त ॲड . बाळासाहेब आंबेडकरच गायरान, जमीन हक्क, एसआरए इत्यादीसाठी प्रत्यक्ष हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांसह रस्त्यावर येऊन आंदोलन करून न्याय मिळवून देत आहेत ही विशेष बाब स्मरण ठेवून वंचितांनी पुढील दिशा निश्चित करावी असे प्रतिपादन विश्व विख्यात ‘कास्ट मॅटर्स’ ग्रंथाचे लेखक डॉ. सूरज एंगडे यांनी केले.

 

सर्वधर्मीय फुले-शाहू-आंबेडकर जयंती महोत्सव समिती, सह्याद्री माजी विद्यार्थी संघटना शिवाजी महाविद्यालय व महावंदना परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने स्मृति. बुद्धप्रिय कबीर नगरी, शिवाजी महाविद्यालय सांस्कृतिक सभा गृहात आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष आंबेडकरी जेष्ठ विचारवंत शांताराम बापू पंदेरे होते.

युक्रांत, दलित पँथर, नामांतर, गायरान, आदिवासी जमीन हक्क यासाठी तहयात कार्यप्रवण असलेले शांताराम बापू पंदेरे हे बहुजन नायक ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रगल्भ नेतृत्वावर विश्वास ठेवून भारिप बहुजन महासंघ ते वंचित बहुजन आघाडी च्या संघर्षशील प्रवासातील एक माईलस्टोन आहेत. ‘प्रबुद्ध भारत’ पाक्षिकातील त्यांचे लेखन सर्व अभ्यासकांना व कार्यकर्त्यांना ऊर्जा निर्माण करणारे आहे, त्यांच्या या अविरत व समर्पित कार्याची विशेष दखल घेऊन *आंतरराष्ट्रीय विचार उत्सव समितीने प्रतिष्ठेचा “सम्यक जीवन गौरव पुरस्कार”* प्रदान करून सन्मानित केले आहे.

पुढे बोलतांना डॉ. सूरज एंगडे म्हणाले की, आंबेडकरी तत्वज्ञान हाच भारतीयांच्या उत्थानाचा महामार्ग आहे.

फुले-आंबेडकर-पेरियार यांच्या राष्ट्रवादाच्या संकल्पनेची पूर्वअट जातीअंत ही आहे परंतू प्रस्थापितांनी मूलभूत व्यवस्थेवर कब्जा करीत जाती व्यवस्था दृढ केली आहे असा घणाघात त्यांनी केला. भावनिक आंदोलनांच्या पलिकडे जाऊन सर्वंकष परिवर्तनासाठी अर्थ-व्यवस्थेतील आपला वाटा घेण्यासाठी नव्या पिढीने संघर्ष सज्ज राहिले पाहिजे अशा भावना ही त्यांनी व्यक्त केल्या.

यावेळी जळगाव येथील प्रख्यात इतिहासकार प्रो. डॉ. देवेंद्र इंगळे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनातून भारताचा इतिहास हा पराजयाचा आहे अशी वास्तव मांडणी केली आहे. वंशशुद्धीच्या भ्रामकतेने निर्माण केलेले वंशश्रेष्ठत्वाचे वर्चस्व यातून शोषीत वंचितांचे दमन झाले आहे या पार्श्वभूमीवर आपण आपल्या राष्ट्रकल्पनेचेच पुनरमूल्यांकन करून समता युगाकडे मार्गक्रमण केले पाहिजे तसेच राज्यकर्त्यांनी संवैधानिक नैतिकतेचे पालन केल्याशिवाय लोकशाही यशस्वी होणार नाही. लोकशाही संवर्धित करण्यासाठी मुक्तीगामी व जनवादी आशयाच्या राजकीय विषय पत्रिकेची पुनर्रमांडणी

आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाची भूमिका अ.भा. हिंदी महासभेचे प्रांत मंत्री प्रा. डॉ. सुरेश शेळके यांनी तर सूत्रसंचालन यशवंत मकरंद, सुनील ढवळे यांनी केले. मानपत्राचे वाचन डॉ. सुरेश हिवराळे तर अतिथीचा परिचय सुरेश हिवाळे यांनी दिला.

या सोहळ्यात मोतीराम सोनकांबळे यांना ‘लोककवी वामनदादा सहकारी पुरस्कार’ देण्यात आला. महानाट्य यशोधरा, नालंदा धम्म विद्यालय यांच्या सह आदर्श भीमजयंती मंडळ, वर्षावास ग्रंथवाचक व विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. डॉ. प्रकाश डाके व डॉ. भगवान धूतमल यांच्या सेवा निवृत्ती निमित्त विशेष सत्कार करण्यात आला.

या सोहळ्यास बी. एच. सहजराव, प्रा. डॉ. भीमराव खाडे, प्राचार्य बी. यु. जाधव, डॉ. राजेंद्र गोणारकर, ॲड. मंगेश वाघमारे, सूर्यकांत हाके, विजय लोखंडे, ॲड . सुनील सौंदरमल, प्रा. नागोराव पांचाळ, भगवान जगताप, प्राचार्य विठ्ठल घुले, नारायण जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या