3.3 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

spot_img
spot_img

महाराष्ट्र राज्य ऊसतोड वाहतूक कामगार व मुकादम संघटना बीड जिल्हा अध्यक्षपदी -सतोष काळे

बीड प्रतिनिधी – दुष्काळ नापिक अतिवृष्टी अशा आसमानी व सुलतानी संकटाचा सामना बीड जिल्ह्यातील, शेतकरी,शेत मजुर ऊसतोडणी कामगारांना करावा.त्यामुळे बीड जिल्ह्यातील स्थलांतरित ऊसतोड कामगारांची संख्या राज्यात सर्वाधिक आहे जवळपास माजलगावच्या गंगाधर व परळीचा काही भाग सोडता तर ऊसतोड कामगारांचा संपूर्ण बीड जिल्ह्यातून सहा महिने स्थलांतरित होतात प्रामुख्याने ज्यांना एक गुंठा जमीन नाही असे अनुसूचित जाती जमातीचे विमुक्त भटक्या जनजातीचे काही प्रमाणात मराठा समाजाचे धनगर लमान वंजारी या जाती चे समूहातील लोक मोठ्या प्रमाणात प्रगत महाराष्ट्र सहकर्ण कर्नाटक गुजरात या राज्यात ऊस तोडणी साठी जातात त्यामुळे आमचा जिल्हा ऊस तोडणी कामगारांचा ब्रँड बनला आहे या बीड जिल्ह्याची ओळख ही ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखली जाते या असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांना खूप आभार कष्ट करावे लागते ते स्वतः तर जातातच सोबत लहान मुले गुरढोर जनावर बकऱ्या शेळ्या मेंढ्या सोबत घेऊन जातात अक्षरशः गावेच्या गावी आक्टोंबर ते फेब्रुवारी मार्च पर्यंत ऊस पडलेली असतात औद्योगिक क्षेत्रात बीडला प्राधान्य नाही सिंचनाची सोय नाही त्यामुळे खरीप हंगाम नंतर शेती काहीच पिकत नाही सगळे चित्रात घेऊन वाडी वस्ती तांडा वरील गावातील लोक शहरी झोपडपट्ट्यात झालेली आहे लोक ऊस तोडणीचा कामगार आहेत या कामगारांना खऱ्या अर्थाने राज्य सरकारच्या अजेंड्यावर आणण्याचे काम कामगार नेते बीड जिल्ह्याचे माजी खासदार केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांनी केले आहे गोमळवाडा येथील बैलगाड्यांचे मुकादम हरी खंडू ढाकणे बाबासाहेब बांगर किसन सुसलादे गहिनीनाथ थोरवे कारभारी खाडे दत्तोबा भावे सदाशिव मुंडे यांनी बबनराव ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली कोयता बंद आंदोलन केली आहे स्वर्गीय मोहन मुंडे केशव आंधळे राजाभाऊ मुंडे सोमनाथ बडे विष्णू जायभाय श्रीरंग भांगे श्रीराम पोटे यांनी चिंचवड येथे डोंगर पट्ट्यात ऊस तोडणी कामगारांची परिषद घेतली आणि राज्याच्या इतिहासातील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण पालकमंत्री अशोक पाटील समाज कल्याण मंत्री दादासाहेब रूप होते कामगार मंत्री भागवतराव गायकवाड कामगारांचे नेते किशोर पवार मधुकर कात्रे यांचे सह बबनराव ढाकणे यांची मान्यता प्राप्त संघटनेची ऐतिहासिक करार झाला आणि ऊसतोड मजुरांच्या जीवनाची नवी पहाट उगवली आता अनेक मतपेटीवर डोळा ठेवून आपापल्या संघटना काढले आहेत आजही साखर संघ आयुक्त ऊस तोडणी कामगारांचे नेते यांच्यात जो करार होतो त्यांची अंमलबजावणी केले जाते 2020 ला करार झाला 14% ची वाढ झाली माननीय शरद पवार स्वतः मांजरीला हजर होते जयप्रकाश दिडे गावकर पंकजाताई मुंडे डॉक्टर डी एल कराड जीवनराव राठोड प्रदीप भांगे दादा मुंडे मी स्वतः प्राध्यापक सुशीला मोराळे साखर आयुक्त अनेक मंत्री चेअरमन यांच्या हा करार झाला होता आता 2023 ला या कराराची मुदत संपली आहे हे करार कराराचे वर्ष आहे लढल्याशिवाय मिळणार नाही महागाईने कर केला आहे मात्र मजुरीने वाढ नाही पाच लाख पेक्षा जास्त ऊसतोड मजूर कामगार जिल्ह्यात आहेत परंतु त्यांना ओळखपत्र अजूनही दिलेले नाही एक लाखापेक्षा जास्त नोंदणी आहे या कामगारांना ओळखपत्र असणे गरजेचे आहे असंघटित नवनिर्वाचित अध्यक्ष संतोष काळे हे स्वतः ऊस तोडणी ऊस तोडतात त्यामुळे त्यांची जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड केलेली असल्याचे संघटनेच्या लढाई नेत्या व संघटनेच्या राज्याच्या सरचिटणीस प्राध्यापक सुशिलाताई मोराळे यांनी म्हटले आहे ऊस तोडणी कामगार वाहतूक मुकादमांच्या दिवसेंदिवस गंभीर प्रश्न त्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम ऊसतोड संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष काळे हे करतील त्यांच्या या निवडीचे देविदास चव्हाण बबन आंधळे मारुती शिरसाट मच्छिंद्र मिसाळ मुरली बांगर शेख गणीभाई राजाभाऊ देशमुख संजय नागरगोजे बाबा साळवे वैजनाथ शिंदे राजेंद्र दराडे कृष्णा कावळे लक्ष्मण आरे बिबीशन उकांडे सुरेश उमाप भीमा करांडे रमेश शिरसागर सिद्धू निसर्गर यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा दिल्या

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या