20.7 C
New York
Friday, April 17, 2026

Buy now

spot_img
spot_img

लहुजी शक्ती सेनेच्या महिला आघाडी बीड जिल्हा उपाध्यक्ष पदी सोनिया ताई चांदणे तर रुद्राक्ष भैय्या चांदणे यांची विद्यार्थी आघाडी तालुका अध्यक्ष बीड पदी निवड

बीड :-

महाराष्ट्रामध्ये मातंग समाजासाठी रस्त्यावर उतरून काम करण्यासाठी नामांकित असलेली लहुजी शक्ती सेना या संघटनेमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची आवक चालू आहे. नुकताच महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष असलेले कैलास दादा खंदारे यांचा बीड जिल्हा दौरा पार पडला यामध्ये सुद्धा आंबेजोगाई व केज मधून मोठ्या प्रमाणावर युवकांनी प्रवेश केला होता.

लहुजी शक्ती सेना संस्थापक अध्यक्ष माननीय श्री विष्णू भाऊ कसबे व प्रदेशाचे अध्यक्ष कैलास दादा खंदारे आणि बीड जिल्ह्यातील डॅशिंग नेतृत्व लहुजी शक्ती सेनेचे युवक प्रदेश उपाध्यक्ष भागवत भाऊ वाघमारे यांच्या नेतृत्वामध्ये आणि लहुजी शक्ती सेनेमध्ये नवनियुक्त मराठवाड्याच्या महिला उपाध्यक्ष जयाताई लांडगे यांच्या उपस्थितीमध्ये बीड शहरातील सोनिया ताई चांदणे यांचा बीड जिल्हा उपाध्यक्ष महिला आघाडी या पदी निवड करण्यात आलेली आहे.

तर लहुजी शक्ती सेना विद्यार्थी आघाडीच्या बीड तालुका अध्यक्षपदी रुद्राक्ष भैय्या चांदणे यांची निवड करण्यात आलेली आहे तरी सर्वच तरातून यांच्या निवडीचे स्वागत करण्यात येत आहे. सध्याच्या काळात लहुजी शक्ती सेनेवर विश्वास ठेवून मातंग समाजातील अनेक युवक आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर संघटनेमध्ये काम करण्यासाठी उत्सुक आहेत.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या