3.4 C
New York
Tuesday, December 3, 2024

Buy now

spot_img
spot_img

निवडणूक खर्च निरीक्षकांनी विभाग प्रमुखांचा घेतला आढावा

बीड दि. 24 :- बीड जिल्ह्यातील आष्टी, केज व परळी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे खर्च निरीक्षक के. रोहन राज आणि गेवराई, माजलगाव व बीड विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे कपील जोशी यांनी आज निवडणूक खर्च विषयक कामकाजाचा आढावा घेतला.

यावेळी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी त्यांचे स्वागत केले. बैठकीस पथकांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

स्थिरनिगरानी पथक तसेच भरारी पथकाच्या गेल्या काही दिवसातील कार्याचा सविस्तर आढावा निरीक्षक यांनी घेतला. तसेच निवडणुकीच्या खर्चावर नियंत्रण ठेवणाऱ्या खर्च समितीच्या सर्व अधिकाऱ्यांनी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आवश्यक ती सर्व कार्यवाही पार पाडावी अशा सूचना केल्या. यासह माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीनेही दक्षतेने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या