◼️चकलांबा पोलीस ठाणे प्रमुख जिल्हा विशेष शाखेतील संदीप पाटील यांची नियुक्ती
◼️नारायण एकशिंगे यांच्या कार्यकाळात अवैध धंदे बंद आहे; यापुढे संदीप पाटील हे अवैध धंदे बंद ठेवतील का?
गेवराई, महाराष्ट्र आरंभ वृत्त : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गेवराई तालुक्यातील चकलांबा या पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे यांची बदली करण्यात आली आहे. तसेच त्यांना उपविभागीय गेवराई येथे वाचक म्हणून देण्यात आले आहे. चकलांबा या ठिकाणी जिल्हा विशेष शाखेतून संदीप पाटील हे रूजू होणार आहेत. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी हे आदेश काढले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे यांनी त्यांच्या कार्यकाळात गुन्हेगारी, अवैध धंदे राजरोसपणे सुरू असताना, त्यांच्यावर कठोर पावलं उचलत कारवाई करून गुन्हेगारी व अवैध धंद्यावर आळा घातलेला आहे. चकलांबा येथील नागरिकांना चकलांबाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा कर्तव्यदक्ष आणि सिंघम अधिकारी पाहायला मिळाला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे यांनी चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना विश्वासात घेऊन पोलीस आणि नागरिकांमध्ये सलोख्याचे संबंध तयार केले.गुन्हेगारांना तसेच अवैध धंदे करणाऱ्यांना आळा घालत कायम व सुव्यवस्था राखण्याचे काम सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे यांनी चोख पार पाडले आहे. त्यांच्या कार्यकाळात अवैध धंदे हे बंद आहेत. आता यापुढे पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे अवैध धंदे असेच बंद ठेवतील का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. असा खमक्या आणि सिंघम अधिकारी म्हणून नारायण एकशिंगे यांची ओळख निर्माण झाली आहे. आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत असताना, तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र पाहरा देऊन पोलीस खात्यातील कर्तव्यनिष्ठ व प्रमाणिक अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे यांची ओळख आहे.