◼️बीड जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयामध्ये पैसे घेतल्याशिवाय नागरिकांची कामच होत नाही?
गेवराई महाराष्ट्र आरंभ प्रतिनिधी : बीड जिल्ह्यामध्ये लाचखोरी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच बीड जिल्ह्याला लागलेल्या लाचखोरीच्या ग्रहणाचा भांडाफोड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकांकडून करण्यात येत आहे. लाचखोरांवर मोठमोठ्या कारवाया सुरू असतानाच आता एका प्रकरणात पंधरा हजारांची लाच घेताना महावितरणच्या लाईनमनला व एका हाॅटेल चालकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. त्यांनी नवीन मीटर बसवून वीज चोरीचा अतिरिक्त दंड न लावण्यासाठी लाईनमन जीवन मुंडे यांनी वीस हजार रूपयांची लाचेची मागणी केली होती. परंतु ती तडजोड करून पंधरा हजारांची रक्कम घेताना रंगेहाथ पकडले आहे. तक्रारदाराचे बीड तालुक्यातील मंजिरी फाटा पाली येथे व्यवसायिक शेटर असून तेथील मीटर जळाल्याने नवीन मीटर बसवून देण्यासाठी कर्ज केला होता. परंतु यासाठी या लाचखोर लाईनमन ने लाचेची मागणी केली होती. त्यानुसार ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव, पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड तालुक्यातील मंजिरी फाटा येथे केली आहे. याप्रकरणी लाईनमनवर व हाॅटेल चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.