29.1 C
New York
Monday, June 17, 2024

Buy now

कुठल्याही पक्षाची फोडा फोड न करता युवकांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश नव तरूणना मनसे एक प्रभावी पर्याय-सदाशिव बिडवे

कुठल्याही पक्षाची फोडा-फोडी न करता असंख्य नवयुकांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश

 

तरुणांसमोर मनसे योग्य आणि प्रभावी पर्याय- सदाशिव बिडवे

 

बीड (प्रतिनिधी):- महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष व हिंदूजननायक, मराठी हृदयसम्राट मा.राजसाहेब ठाकरे यांच्या व तरुण हृदयसम्राट अमित साहेब ठाकरे यांच्या विचाराला प्रेरीत होवून तसेच मनसे नेते दिलीपबापू धोत्रे, राज्य उपाध्यक्ष अशोकभाऊ तावरे, शेतीकरी सेना प्रदेशाध्यक्ष संतोषभाऊ नागरगोजे, महिला राज्य उपाध्यक्ष वर्षाताई जगदाळे व जिल्हाध्यक्ष श्रीराम बादाडे, मनसे वाहतुक सेना राज्य उपाध्यक्ष रवि नेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड शहरातील असंख्य नवतरुणांचा महराष्ट्र नवनिर्माण सेनेत शनिवार दि.5 ऑगस्ट 2023 रोजी शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाला.

या प्रवेश सोहळ्यावेळी बोलतांना मनसेचे बीड जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव बिडवे यांनी युवकांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, राजकारणातील प्रस्थापितांची मक्तेदारी, जातीय समिकरणे, लोकप्रतिनिधींच्या इकडून तिकडे बेडूक उडया, विकास या गोंडस नावाखाली मोठ्या होत असलेल्या व निपजत असलेल्या पिढ्यानपिढ्या व तेच ते लोकप्रतिनिधी या सर्वांचा बीड जिल्ह्यासह शहराची झालेली भयान व बकाल परिस्थितीचा आजच्या नवतरुणांना प्रचंड तिटकारा आला असून अशा परिस्थितीत नवतरुणांसमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच योग्य आणि प्रभावी पर्याय आहे असेही सदाशिव बिडवे म्हटले. यावेळी शहराध्यक्ष करण लोंढे आपल्या भाषणात म्हणाले की, तरुणांना ज्या-ज्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्या समस्या त्यांनी मनसेकडे बोलून दाखवाव्यात त्यांच्या समस्यांचे आम्ही नक्कीच निराकरण करुन न्याय देण्याचा प्रयत्न करुत. कोणावरही यापुढे अन्याय होऊ दिला जाणार नाही. शहर उपाध्यक्ष अकाश टाकळकर यांनीही प्रवेश करत असलेल्या तरुणांना यथोचित मार्गदर्शन केले. यावेळी मनसेमध्ये प्रवेश केलेले रणजीत जाधव, यश राठोड, महेश कोकाटे, आदित्य राठोड, तेजस मस्के, निखील शिंदे, ओंकार मुंडे, प्रसाद हावळे, अजय केंधरणे, सक्षम मस्के, सौरभ मुंडे, ओंकार डुकरे, अतुल शेरकर, उमेश पैळ, अभिषेक मुसळे, सिध्दार्थ हजारे, सुरज थापडे, अजय लांडे, विवेक गुंदेकर, यशराज शिंगटे, प्रबोध चोरमले, सोनाजी राडे, देविदास शेरकर, दिपक दंडवते, मदन खुळे, कैलास लांडे, रोहण खरसाडे, नारायण कोकाटे, अविनाश मगर, विलास अय्यर आदी युवकांचा यथोचित सत्कार करुन मनसेत प्रवेश घेण्यात आला. हा प्रवेश सोहळा शहर उपाध्यक्ष आकाश टाकळकर, मनसे विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष सुर्या तावरे, मनसे शहर सचिव तुषार दोडके यांच्या पक्ष संघटन कौशल्यातून झाला. यावेळी मनसेचे वडवणी तालुकाध्यक्ष नवनाथ करांडे, विद्यार्थी सेनेचे अभिजीत गोरे, सुनील टाकळकर, ओम पालवे, विजय शिंदे, अनिल जमदाडे, राम पैठणे व पदाधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या