23.1 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

spot_img
spot_img

बीड मधील प्रलंबित प्रश्न प्राधान्याने मार्गी लावणार -डॉ योगेश क्षिरसागर

बीडमधील प्रलंबित प्रश्न प्राधान्याने मार्गी लावणार -डॉ.योगेश क्षीरसागर

 

-कृषी कॉलनीत सिमेंट रस्ता कामाला सुरुवात

 

बीड (प्रतिनिधी)

दि.४ : शहरवासीयांना मुलभूत सुविधा मिळवून देणे आपले कर्तव्य आहे. मुलभूत सुविधांच्या अनुषंगाने प्रलंबित प्रश्न प्राधान्याने मार्गी

लावणार असल्याची ग्वाही, युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी दिली आहे.

 

शहरातील पंचशील नगरातील कृषी कॉलनी परिसरातील सिमेंट रस्ता, नाली या कामास प्रत्यक्ष सुरुवात शुक्रवारी (दि.४) करण्यात आली. या कामाची पाहणी करताना डॉ.क्षीरसागर हे बोलत होते. यावेळी पदाधिकारी, स्थानिक नागरिकांनी त्यांचे स्वागत केले.

 

कृषी कॉलनी परिसरात गेल्या काही दिवसांपासून विद्युत खांब बसवण्याची मागणी होती. त्याअनुषंगाने महावितरण कंपनीस सातत्याने पाठपुरावा करून सदरील विद्युत खांब मंजूर करून घेतले, त्याचे देखील काम प्रत्यक्ष सुरू झाले. मुलभूत सुविधा मिळाल्याबद्दल स्थानिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक नरसिंग नाईकवाडे, गणेश वाघमारे, शुभम धूत, प्रमोद शिंदे, नाना मस्के, कपिल सोनवणे, बंडू निसर्गध, आण्णाभाऊ भालेराव, ऋषभ वाघमारे, शुभम कातांगळे, काशिफ चाऊस, शिवाजी कांबळे, महेंद्र वडमारे, बाबा धन्वे, वंजारे, धन्वे फौजी, बाळासाहेब काकडे, वाघमारे, हर्षद वडमारे, चेतन पवार, अविनाश कांबळे, नाना मस्के, अर्चना डोळस, निर्मला कांबळे, सारिका वाघमारे, वंजारे, धन्वे, चक्रे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या