*सिरसदेवी येथील अट्रॉसिटीतील आरोपी तलवाडा पोलिस यंत्रनेमुळे मोकाट*
************************
*डीवायएसपी राजगुरू साहेब आरोपीना कधी अटक करणार?*
*************************
सिरसदेवी /प्रतिनिधी *(शाम अडागळे )*:- गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथील रहिवाशी राम भारत अडागळे यांना गावातीलच दोघांनी दि.11/07/2023 रोजी सायंकाळी 6:30 च्या सुमारास अडागळे यांना जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्या बद्दल अट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल झाला असून आरोपी सध्या तलवाडा पोलीस यंत्रनेमुळे मोकाट आहेत.
सविस्तर असे कि, तालुक्यातील सिरसदेवी येथील सामाजिक कार्यकर्ते राम भारत अडागळे यांना गावातील भगवान विष्णू मोरे, सतीश चत्रभुज कदम यांनी आमच्या गाडीला कट का मारला या कारणावरून अडागळे यांना भगवान मोरे यांनी गचूरीला धरून खाली पाडले व सतीश कदम यांनी लाथा बुक्क्यानी मारहाण करून, जातीवाचक शिवीगाळ व मांगट्या तू लय मजलास तुला जिवच मारून टाकू अशी धमकी दिली. यामुळे दि.11/07/23 रोजी भगवान विष्णू मोरे, सतीश चत्रभुज कदम यांच्या विरोधात 323,504,506,34,3(1)(r),3(1)(s),3(2)(va) अट्रॉसिटी ऍक्ट नुसार तलवाडा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद होऊन 15 ते 16 दिवस होऊन गेली आहेत. तसेच या गुन्ह्याचा तपास डी वाय एसपी नीरज राजगुरू यांच्या कडे असून देखील आरोपी अद्याप अटक नाहीत तसेच हे आरोपी सिरसदेवी गावात खुलेआम मोकाट फिरतात, अवैध रित्या ऑनलाईन चक्री चालवतात असे असताना पोलिसांना दिसत नाही का? तलवाडा पोलीस कोणाच्या दबावाखाली काम करतय? राजगुरू साहेब आरोपीना का अटक करत नाहीत? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
तसेंच सध्या दलितांवर अन्याय अत्याचार वाढले असून पोलिसांनी जातीय गुंडावर वेळीच कारवाई करणे योग्य आहे. अट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल होऊन सुद्धा पोलीस आरोपीला मोकाट फिरून देतात तरी कशे. तसेच या आरोपीना कायदाचा धाक कसलाच राहिला नाही, कायदा आमच्या खिशात असल्या सारखे वागतात असे असताना आरोपीला अटक होत नाही ही लाजिरवाणी बाब आहे.
तसेंच आरोपी मोकाट असल्यामुळे फिर्यादीच्या कुटुंबाला व फिर्यादीच्या जीवितास या आरोपीकडून धोका असतो त्यामुळे आरोपीना तात्काळ अटक करणे गरजेचे असते असे असताना सिरसदेवी येथील अट्रॉसिटीतील आरोपी तलवाडा पोलीस यंत्रनेमुळे मोकाट गावात फिरत आहेत तरीही पोलिसांना डोळे असून दिसत नाहीत. यामुळे मा.डी वाय एसपी राजगुरू साहेबांनी या गुन्ह्यातील आरोपीना तात्काळ अटक करावी अशी मागणी फिर्यादी कडून होत आहे.