बहुजन जनता दलाची भंडारा जिल्ह्यात स्थापना.
————————————
पंडितभाऊ दाभाडे यांचे हात मजबूत करा. नरेश गजभिये
————————————
भंडारा दि. पुरोगामी शिव शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षापासून सक्रिय असलेल्या बहुजन जनता दलाची महत्वपूर्ण बैठक बहुजन जनता दल संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे च्या आदेशावरून .तारोने सभागृह तहसील कार्यालय जवळ मेन रोड लाखांदूर जिल्हा भंडारा येथे रविवार दि 23 जुलै 2023 रोजी भंडारा जिल्हा बहुजन जनता दल कार्यक्रते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली संपन्न झाली.
झालेल्या बैठकीमध्ये सर्वानुमते निर्णय घेण्यात आला की भंडारा जिल्ह्यात बहुजन जनता दलाच्या कार्याला सुरुवात करण्यात आली असून पुरोगामी महाराष्ट्रात शिव शाहू फुले डॉ आंबेडकरांच्या विचारावर आधारित समता बंधुता न्याय राष्ट्रीय एकात्मता सामाजिक न्याय शैक्षणिक व समाज व्यवस्था मजबूत करण्यावर भर दिला जाईल सदर झालेल्या बैठकीमध्ये नरेश बाळकृष्ण गजभिये यांची भंडारा जिल्हा बहुजन जनता दल अध्यक्षपदी सर्व मते निवड करण्यात आली.
भंडारा जिल्ह्यातील दलित बहुजन वंचित अल्पसंख्यांक अनुचित जाती जमाती यासह अनेक घटकांच्या समाजाला सोबत घेऊन त्यांचे प्रश्न सोडण्याचा व त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार तेव्हा भंडारा जिल्ह्यातील शिव शाहू फुले डॉ आंबेडकर यांच्या विचारांना मानणाऱ्या सर्व समाजातील घटकांच्या नागरिकांनी बहुजन जनता दलामध्ये सहभागी होऊन बहुजन जनता दल संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांचे हात मजबूत करा असे आव्हान भंडारा जिल्हा बहुजन जनता दल नवनिर्वाचित अध्यक्ष नरेश गजभिये यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे