- सायं दैनिक महाराष्ट्र आरंभचे दोन शब्द…
- लेक लाडकी बीड जिल्ह्याची उंच गगणं भरारी घेत अखंड हिंदुस्थानाच्या मनांवर अधिराज्य गाजवणारा आवाज..
पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे साहेब…
लेक लाडकी बीड जिल्हाची उंच भरारी गगणं भरारी घेत अखंड हिंदुस्थानाच्या मनांवर अधिराज्य गाजवणारा आवाज स्वर्गिय गोपीनाथ मुंडे साहेब याचा आवाज.. बीड जिल्ह्याचा अभिमान आमचा स्वाभिमान सर्वसामान्य सर्वसामान्यांचा आधार आपली ताई जी आज तमाम भारतामध्ये भारतीय जनता पार्टीचा एक वेगळा स्टार चेहरा म्हणून ओळखले जाते त्याच स्टार चेहऱ्याने आज भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचा आवाज पोहोचविण्याचे काम करत बीड जिल्ह्याची मान अभिमानाने उंच करत बीड जिल्ह्यामध्ये व महाराष्ट्रामध्ये विकास गंगा आणली ज्या पंकजाताईंनी स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची कधी न भरून येणारी पोकळी बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य कार्यकर्ता असो वेगवेगळ्या जाती धर्मातील माता-भगिनी बंधू भाऊ यांच्या अडीअडचणीला धावून जात ऊस तोडांचा बीड जिल्हा ओळखला जाणारा बीड जिल्हा हा साडेपाच लाख ऊसतोड मजूर पश्चिम महाराष्ट्र सहकार कर्नाटक मध्ये ऊस तोडणीसाठी पुरवठा त्यावेळेस बीड जिल्हा अक्षरशा ऊस पडलेला असतो तर यामुळे ऊसतोड मजुरांना वेगवेगळ्या राज्यात जिल्ह्यात कामाला जावे लागते त्यावेळेस अडचण आली तर आम्ही पंकजाताईंच्या गावचे आहोत बीड जिल्ह्यातील आहोत स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या जिल्ह्यातल्या होत असं जेव्हा सांगतात त्या त्या राज्यातील त्या जिल्ह्यातील लोक त्यांना खूप मोठे अभिमान आहे तसेच ती नेतृत्व करत असताना मातृत्व कधीही न सोडता त्या ताईने अर्थात आपल्या पंकजाताईंनी मातृत्व जपत असताना बीड जिल्ह्यातील लाखो मातांना पालकमंत्री असताना वेगवेगळ्या उद्योगासाठी निधी उपलब्ध करून देत ऊसतोड मजुरांसाठी निधी उपलब्ध करून देत स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या नावाने ऊसतोड मजुरांसाठी महामंडळाची स्थापना करण्यासाठी सरकारला भाग पाडले एका इशाऱ्यावर महाराष्ट्रातील राजकारण व सरकार पडू शकते इतकी ताकद माझ्या ताईची हातात माझ्या पंकजाताईची आहे यामध्ये पंकजाताईंच्या पाठीशी खंबीरपणे लोकप्रिय खासदार डॉक्टर प्रीतम ताई मुंडे यांचीही या ठिकाणी सर्व सामान्य माणसाला मदतीचा हात म्हणून सदैव हाक दिली तर सदैव साथ खासदार डॉक्टर प्रीतम ताई आपण देत आहात यावेळेस पंकजाताईंना जेवढा शुभेच्छा आहेत तेवढ्या शुभेच्छा महाराष्ट्रातील तथा भारतातील कदाचित कोणत्याही नेत्याला आजपर्यंत करता आले नाहीत कारण पंकजाताईंचा अंगी जे गुण आहेत जे संस्कार आहेत त्यांचे वडील स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचे संस्कार व भारतीय जनता पार्टीमध्ये लहानाच्या मोठ्या झालेल्या पंकजाताई यांनी स्वतः झोकूण स्वतःला झोकून देत एक वेगळा ठसा महाराष्ट्रातील जनतेच्या मनावरती मोठालेला आहे या ठिकाणी माननीय ताईंना लाख वेळेस सलाम करतो कारण या माझ्या माता-भगिनींचा न्याय हक्कासाठी सदैव लागणारी माझी बहीण पंकजाताई यांनी सदैव 18 सुमित पगड जाती- धर्मातील बहुजनांना ताठ कणा आणि स्वाभीमानी बाणा, देणार्या लोकनेते मुंडे साहेब यांची लेक पंकजाताई मुंडे यांचा आज वाढदिवस… नेता नव्हे तर मी माता आहे, म्हणणार्या पंकजाताई भारतीय राजकारणातील एकमेव नेत्या आहेत… राजकारण केवळ सत्तेचा सरीपाट नाही तर नितिमत्तेचा परिपाठ आहे, हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून देणार्या पंकजाताई खुप नम्र, हळव्या, मायाळू अन् कर्तव्यकठोरही आहेत… देवीची जशी विविध रूपे असतात तशा पंकजाताई आहेत… ताईंवर खुप अन्याय झाला आहे, आजही होत आहे… परंतू साक्षात महिशासुर मर्दीनी असलेली लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची लेक वादळाचे दुसरे नाव आहे… हे वादळ उद्विग्न असूनही खुप शांत आहे… प्रचंड आक्रमक असलेले त्यांचे समर्थकही कमालीचे शांत आहेत… परंतू वादळाने तुफानाचे रूप धारण करण्यापुर्वीची ही शांतता आहे… पंकजा मुंडे नावाचे वादळ जेव्हा तुफान बनेल तेव्हा, भल्या भल्यांचे तख्त अन् मी- मी म्हनणारांचा पाला- पाचोळा झाल्याशिवाय राहणार नाही…
खंडप्राय आणि विविधतेने नटलेल्या भारतात पाच हजारापेक्षा अधिक जाती- जमाती आहेत… यात साडेचार हजारापेक्षा अधिक जाती मायक्रो अथवा लहान आहेत… डोंगर- दर्या खोर्यात राहणार्या आणि रानटी जिवन जगणार्या लहान समाजात थोर संत भगवानबाबा आणि लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा जन्म झाला… लहान समाजात असे महापुरूष जन्मन्यासाठी शेकडो वर्षाचा कालावधी लागतो… सुदैवाने जन्मलेल्या बाबा आणि साहेबांनी सारी परिस्थितीच बदलून टालकी… पावला- पावलावर त्यांच्या वाट्याला संघर्ष आला… परंतू काळ कितीही वाईट असला तरी परिस्थितीच्या माथ्यावर पाय देऊन या महात्म्यांनी कृतीशिल समाज सुधारकाच्या भूमीकेतून काम केले… भगवानबाबा यांनी त्या काळात शाळा काढल्या, वसतीगृह सुरू केले… “शेती विका पण शिका” हा कानमंत्र बहुजन समाजाला दिला… त्याच भगवान बाबांचे अनुयायी असलेल्या लोकनेते मुंडे साहेबांनी सर्व जाती- धर्मातील वंचीत, उपेक्षीत, पीडीत मानसाला स्वाभीमानी बाना अन् ताठ कणा दिला… बाबा असो या साहेब, त्यांनी कधीही दिलेला अन् बोललेला शब्द मागे घेतला नाही, विचारांची प्रतारणा केली नाही… नेतृत्व आणि दातृत्वाची भुमिका त्यांनी काय निभावली…. बालाघाटाच्या कुशीत जन्म घेऊन साहेबांनी हिमालय देखील माझ्यापुढे थिटा आहे, हे कृतीतून दाखवून दिले… गुलाल बुक्क्याप्रमाणे आमदार, खासदारकीची पदे वाटली… भाजपाला बहुजनांचा पक्ष बनवले… 1995 ते 99 या चार वर्षातील सत्तेचा अपवाद वगळला तर साहेब, कायम विरोधी पक्षात होते… परंतू त्यांनी सत्ता आणि विचारांशी कधीही प्रतारणा केली नाही… युती आणि महायुती केली… ठाकरे, जानकर, शेट्टी, आठवले, खोत अशा समविचारी लोकांना सोबत घेतले… सत्ता अन् पदांसाठी वेगळी विचारश्रेणी असलेला पक्ष फोडण्याचे पातक त्यांनी कधीही केले नाही. अशा या विशाल आणि दीमाखदार लोकनेत्याचा वसा आणि वारसा तेवढ्याच दिमाखाने पंकजाताई मुंडे ह्या पुढे नेत आहेत. दुर्दैवाने पित्याचे अपघाती निधन झाले… या दुर्घटनेने आभाळ फाटले, होत्याचे नव्हते झाले… या परिस्थितीतही मी नेता नाही तर माता आहे, म्हणत लाखो करोडो लोकांना पंकजाताई यांनी सावरले… वर्षभरात पीत्याचे स्मारक उभा करणारी पंकजा मुंडे ही देशातील पहिली लेक आहे… त्यांनी केवळ स्मारक उभारले नाही तर पीत्याच्या स्मारकाला मंदीर बनवले आहे… सन 2014 मध्ये ग्रामविकास, जलसंपदा, महिला व बालकल्यान अशी खाती त्यांनी मिळाली. मिळालेल्या प्रत्येक खात्यात त्यांनी देशपातळीवर रोल मॉडेल ठरणारे काम केले… जलसंपदा विभागातील जलयुक्त शिवार ही त्यांची योजना देशात रोल मॉडेल ठरली… या योजनेतून कामे करत मराठवाड्यातील वर्षानुषवर्षाचे दुष्काळाचे दुष्टचक्र त्यांनी संपवले… ग्रामविकास विभागाच्या माध्यामातून ज्या वाड्या- वस्त्या, तांड्यावर साधी पाऊलवाट नाही, तिथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून पक्के रस्ते केले… महिला व बालकल्यान विभागाच्या मंत्री म्हणून माझी कन्या भाग्यश्री सारख्या रोड मॉडल योजना राबवल्या… ग्लोबल ते लोकल नव्हे तर लोकल टू ग्लोबल म्हणत तांड्यावरील महिलांना अमेरिकेत नेले… त्यांच्या पारंपरिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून दिली. बदल्यातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या… जनतेतून सरपंच असे कितीतरी लोकोपयोगी निर्णय पंकजाताई यांनी घेतले… लोकनेते मुंडे साहेब यांचे अधुरे स्वप्न पुर्ण करताना एकाचवेळी नगर- बीड- परळी रेल्वेला हजारो कोटी रूपयांचा निधी मिळवून दिला… बीड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विनले… कायम दुष्काळाच्या सावटात अनंत अडणींचा सामना करणार्या शेतकर्यांना हजारो कोटीचा विमा मिळवून दिला.. ताईंच्या संकल्पनेतील पिक विमा राज्यासाठी रोल मॉडेल ठरला. देश स्वातंत्र्य झाल्यापासूनच्या पन्नास वर्षात बीड जिल्ह्याला जेवढा निधी मिळाला नाही, त्यापेक्षा अधिक निधीची अन् प्रत्यक्ष डोळ्याने दिसणारी कामे पंकजाताई यांनी केली… स्वच्छ प्रतिमा, सत्तेचा गैरवापर नाही, कायदेशीर बाबींत हस्तक्षेप नाही, कार्यकर्ता असला तरी त्याच्या चुकांना पाठबळ नाही, असे पंकजाताई यांचे राजकारण आहे…
एवढ्या चांगल्या, नैतिक आणि नितिमत्तेने राजकारण करणार्या नेतृत्वावर खुप अन्याय झाला आहे… खरेतर आठरापगड जाती- धर्मातील मुंडे समर्थकात प्रचंड रोष आहे… पंकाजाताई यांची राजकीय ताकत महाराष्ट्राच्या काना- कोपर्यात तर आहेच परंतू राज्यस्थान, तेलंगणा, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश या राज्यात देखील त्यांना मानणार्या समर्थकांची संख्या मोठी आहे… नेतृत्व अडचणीत आहे, अडचणीचे डोंगर पुढे उभे करणारे स्वकीय असल्याने पंकजाताई आणि त्यांचे समर्थक जेवढे अस्वस्थ तेवढेच शांत आहेत… पण ही वादळापुर्वीची शांतता आहे… कारण लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची लेक साक्षात वादळ आहे… पंकजा मुंडे नावाचे वादळ जेव्हा तुफानाचे रूप घेईल, तेव्हा भल्या- भल्यांचा अक्षरश: पाला- पाचोळा होणार आहे…
भावी मुख्यमंत्री…. पंकजाताई मुंडे साहेब
आपलाच दिपक थोरात
संपादक सायं दैनिक महाराष्ट्र आरंभ