शिवसेनेचा दणका दाखवू- अनिलदादा जगताप यांची दबंग इंन्ट्री..
बीड ड, प्रतिनिधी-शेतक-यांना विनाकारण वेठीस धरणाऱ्या पं. स. मधील अधिकाऱ्यांची तथा कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेण्यासाठी काल दि. 24 जुलै रोजी दुपारी 2.00 वाजताच्या सुमारास शिवसेना जिल्ह्याप्रमुख अनिलदादा जगताप यांनी आपल्या शिवसैनिकांसमवेत पंचायत समितीमध्ये जाऊन सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला व त्यांना येत्या आठ दिवसांचा अल्टीमेट दिला. अनिलदादा जगताप यांचा आक्रमक पवित्रा पाहून पंचायत समिती अधिकाऱ्यांची बोलती बंद झाल्याची पाहायला मिळाली तर बीडीओ यांनी इथूनपुढे कुठल्याही शेतकऱ्याला पंचायत समितीकडून कोणताच त्रास होणार नाही व कुठल्या अधिकाऱ्याकडून शेतकऱ्यांना वेठीस धरण्यात आले तर त्या अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी ग्वाही दिली.गेल्या काही दिवसांपासून बीड तालुक्यातील पंचायत समितीचे अधिकारी तथा कर्मचारी शेतकरी बांधवांची निरर्थक लूट करत असल्याच्या तक्रारी शिवसेना जिल्हाप्रमुख मा. अनिलदादा जगताप यांच्याकडे होत होत्या. बीड तालुका पंचायत समितीच्या अनागोंदी कारभारामुळे सर्वसामान्य शेतकरी पार वैतागले होते. यामुळेच अनिलदादा जगताप यांनी काल पं स मध्ये जाऊन अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत पंचायत समितीमधील जे अधिकारी, कर्मचारी शेतकऱ्यांची लूटमार करत आहेत व त्यांना वेठीस धरत आहेत अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांना अनिलदादा जगताप यांनी आठ दिवसांत आपल्या कामात सुधारणा करण्याचा अल्टीमेट दिला आहे. पं स कार्यालयात सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रत्येक अधिकाऱ्याची उपस्थिती आपल्या खुर्चीवर असणे गरजेचे आहे. प्रत्येकाचे फोन उचलणे अधिकाऱ्याचे कर्तव्य असून पं स मध्ये येणाऱ्या प्रत्येकाला अधिकारी, कर्मचाऱ्याने सन्मानाची वागणूक द्यायला हवी. बीड तालुका पंचायत समितीमध्ये शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरीसाठी विहिर मंजूर झाल्यानंतर मस्टर काढण्यासाठी फळबाग मस्टर काढण्यासाठी पैशाची मागणी केली जाते, घरकुल कामासाठी व इतर कामे करून देण्यासाठी पैशांची मागणी केली जाते, सर्वसामान्य लोकांची कामे होत नाहीत, अशा तक्रारी इथूनपुढे आमच्याकडे आल्या तर त्या अधिकारी कर्मचाऱ्यांना शिवसेनेचा दणका काय असतो ते दाखवून देऊन असा इशारा यावेळी अनिलदादा यांनी पंचायत समितीला दिला. याप्रसंगी अनिलदादा जगताप यांच्यासामवेत बीड शिवसेनेचे सर्व शेतकरी, पदाधिकारी, शिवसैनिक तथा पंचायत समितीचे सर्व अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.चुकीचं वागणार नाही, चुकीचं होऊनही देणार नाही- अनिलदादा जगतापाची बीड पंचायत समितीत दबंग इंन्ट्री
पंचायत समितीच्या अधिकाऱ्यासोबत आम्ही विनाकारण चुकीचं वागणार नाही आणि शेतकरी बांधव तथा सर्वमान्यासोबत चुकीचं होऊनही देणार नाही. काही अधिकाऱ्यांच्या चुकीच्या वागण्यामुळे बीड तालुक्यातील पंचायत समिती बदनाम होत आहे याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. यापुढे शेतकऱ्यांना कुठल्याही कारणाने वेठीस धरले तर आम्ही कदापि खपवून घेणार नाही. शिवसेनेचा दणका काय असतो त्यावेळी आम्ही दाखवू देऊ याला जबाबदार फक्त पंचायत समिती असेल. वेळ पडली तर शेतकऱ्यांसाठी आणि सर्व सामान्यांसाठी आम्ही जेलमध्ये जाऊ पण कुणावर अन्याय होऊ देणार नाहीत असा कडक इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांनी आपल्या आक्रमक स्टाईलमध्ये पंचायत समिती अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिला.शेतकऱ्यांची लूटमार करणाऱ्या पं. स. अधिकारी, कर्मचाऱ्यांरांना सुतासारखा सरळ करू– अनिलदादा जगताप यांनी दबंग इंन्ट्री मारताच अधिकारी कर्मचारी यांच्या वर धाक बसला आहे यानंतर शेतकरी यांना त्रास होणार नाही असं पंचायत समितीच्या आवारात चर्चा सुरू झाली आहे