पिंपळनेर पोलिसांची चिरीमरी वर ॲट्रॉसिटीतील आरोपींना मोकाट हिंडण्याची देतात मुभा…
ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल होऊनही आरोपी मोकाट कुटुंबा आरोप
बीड प्रतिनिधी – पिंपळनेर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या राक्षस भवन या गावात काही दिवसांपूर्वी जातीवाचक शिवबा केल्याने एकावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला मात्र तरी देखील हा आरोपी पिंपळनेर पोलिसांच्या आशीर्वादाने मोकाट हिंडताना पाहायला मिळतोय.
पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेलं राक्षस भवन या घरा समोरच्या गावात रोडचे काम चालू असताना घरा समोर टाकलेला पाईप तू माझी परवानगी न घेता का काढला म्हणत व नाली का काढली म्हणुन विचारले आस्ता कांताबाई भगवान कानडे व भगवान कानडे यांना आरोपी रमेश गाडे यांनी जातीवाचक शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिली होती या प्रकरणात रमेश गाडे यांनी त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली मात्र यावर कांताबाई भगवान कानडे यांनी पिंपळनेर पोलीस स्टेशन मध्ये रमेश गाडे यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला मात्र गुन्हा दाखल होऊनही दीड महिन्यापासून हा आरोपी फरार आहे. आणि मोकाट हिंडताना देखील पाहायला मिळतो मात्र तरी देखील पिंपळनेर पोलीस स्टेशन या आरोपीला का ? पकडत नाही असा सवाल पिडित कुटुंबीयने उभा केला आहे. जर सर्वसामान्य जनतेला पोलीस प्रशासन जर अशा पद्धतीने आरोपींना मोकाट सोडत असेल तर भविष्यात पीडितांना न्याय आणि संरक्षण कोण देणार हाच मोठा सवाल उभा राहिला आहे.