केवळ आश्वासने न देता सर्वसमावेशक व शाश्वत विकास करण्यावर नेहमीच भर दिला- डॉ. भारतभूषण क्षीरसागर
प्रभाग क्र.2 मधील सहयोग नगर (पूर्व) भागातील विकास कामांची केली पाहणी
बीड दि.१८ (प्रतिनिधी) शहरातील सहयोग नगर (पूर्व) भागातील सिमेंट रस्ते नाली कामाचा मा.नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी आढावा घेत पाहणी केली.
बीड शहरात नगर पालिकेच्या माध्यमातून विविध भागात सिमेंट रस्ते आणि नाल्यांची कामे सुरू आहेत. या कामांसाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी पाठपुरावा केल्यामुळे मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून आणला आहे.याच निधीतून
प्रभाग क्रमांक 2 मधील सहयोग नगर (पूर्व) येथे औसरमल यांचे घर ते नगरे सर यांच्या घरापर्यंत च्या सिमेंट रस्त्याचे व नालीचे काम सुरू आहे. या सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी मा.नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी भेट देत कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी कामाची पाहणी करत दर्जेदार कामासंदर्भात संबंधित यंत्रणेला योग्य त्या सूचना केल्या. याप्रसंगीमा.नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधताना म्हणाले की, शहराच्या वाढत्या नागरिकीकरणाचा विचार करुन नियोजनबद्ध विकास करण्याचा प्रयत्न आम्ही केला असून शहरातील मुख्य रस्त्यासह, अंतर्गत रस्ते, पाणी, आरोग्य, पथदिवे, बंदिस्त गटार अशा मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत ती कामे पूर्ण करण्यावर भर दिला आहे. केवळ आश्वासने न देता सर्वसमावेशक व शाश्वत विकास करण्यावर नेहमीच भर दिला आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी सदैव कटिबध्द असल्याचे सांगितले.रस्ता आणि नालीचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी डॉ भारतभूषण क्षीरसागर यांचा पुष्पगुच्छ देत आभार मानले. यावेळी नगरसेवक बाबुराव दुधाळ, प्रा.सनी वाघमारे, नितीन साखरे, किरण बेद्रे, ज्येष्ठ नागरिकऔसरमल गुरुजी, काळे काका, इंजि.पत्की साहेब, भाटी साहेब, मंगेश देशमुख, अनिल जोशी, राजू दोडके, सुहास जोशी, दिलीप सुर्वे (तलाठी) संतोष जोशी, मनोज शिनगारे उपस्थित होते.