लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षपणामुळे बहादरपूर विकासापासून वंचित – राजेंद्र मस्के
शाळा खोलीचे भूमिपूजन संपन्न …!
नवगण राजुरी जिल्हापरिषद गटातील बहादरपूर गाव राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या महत्वाचे गाव. परंतु अद्याप या गावाला जाण्यासाठी रस्ता नाही. आजही बैलगाडी रस्त्याने लोकांना जावे लागते. गेली सहा महिन्यापासून गावात लाईट नाही. लाईटी अभावी ग्रामस्थांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल चालू आहेत. लोकप्रतीनिधीच्या हलगर्जी पणामुळे रस्ता, लाईट, पाणी या मुलभूत सुविधा गावास न मिळाल्याने विकासापासून गाव कोसो दूर आहे. ही दुर्दैवाची बाब असून, यापुढे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बहादरपूर गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत. असे आश्वासन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी ग्रामस्थांना दिले.
बीड विधानसभा मतदार संघातील राजुरी जिल्हापरिषद सर्कल मधील बहादरपूर येथील नवीन शाळा खोली बांधकाम कामांचा शुभारंभ भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय जिल्हाध्यक्ष तथा बीड विधानसभा निवडणुक प्रमुख राजेंद्र मस्के साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या वाढदिवसा निमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी शिवराम शिरगिरे,सुधाकर चव्हाण, सुग्रीव कोळेकर,पारस कोळेकर, अशोक कोळेकर, संतोष माने, भारत कोळेकर, प्रल्हाद कोळेकर, रमेश कोळेकर, भगवान कोळेकर, रामदास कोळेकर,साळीकराम कोळेकर, युवराज कोळेकर, बापुराव वाघमोडे, यशवंत पवार,शिवराज शिवगिरे, मनोज माने, नितीन माने,सतिष कोळेकर,विकास गव्हाणे, सह गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते