शिंपेटाकळीचे ग्रामसेवक व्हि. जी. पवार यांना 11 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले .
माजलगाव, सुनिल थोरात
माजलगाव तालुक्यातील शिंपेटाकळी ग्रामपंचायतचे लाचखोर ग्रामसेवक श्री पवार यांना लाचलुचपत पथकाने माजलगाव शहरात रंगेहाथ पकडले शिंपे टाकळी ग्रामपंचायत अंतर्गत पंतप्रधान आवास घरकुल योजनेचे ११४ घरकुल मंजूर झाले आहेत परंतु सदर ग्रामविकास अधिकारी प्रती घरकुल १०-१५ हजार रुपये मागत असल्याचे वारंवार निदर्शनास आले होते माझे पंचायत समिती काही काहीही करू शकत नाही व खुशाल तक्रार करा असे देखील ते वारंवार लाभार्थ्यांना धमकावत होते सदर प्रकरणात घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी पैशाची मागणी करण्यात आली होती तक्रारदार परीस्थिती मुळे पैसे देवू शकत नव्हते त्यामुळे त्यांनी लाच लुचप्रतिबंध विभागाशी संपर्क साधून या संदर्भातली तक्रार केली होती बुधवारी सायंकाळी ५च्या सुमारास पवार यांना माजलगाव शहरातुन ताब्यात घेण्यात आले.
शिंपेटाकळी गावातील अनेक नागरीकांनी पवार यांची वारंवार तक्रार करूनही त्यावर कसल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे पवार यांना पाठीशी पारटकर तर घालत नाहीत ना असा सवाल नागरीक करत आहेत.
शिंपेटाकळी चा विकास पवार यांनीच थांबवला.
शिंपेटाकळी ग्रामपंचायत अंतर्गत भ्रष्टाचार करता येतील अशाच कामांचा ठराव घेऊन मनमानी पद्धतीने पवार यांनी केले आहेत त्यामुळे गावात इतर निधी देखील मिळत नाही परीणामी गावचा विकास खुंटला आहे मोठ्या प्रमाणात महसूल गोळा करून तो बुडवण्याच काम पवार यांनी केले असल्याचे आरोप गावकऱ्यांनी केले आहेत.