श्रीमंताचा आला गाडा आणि गरीबाच्या घरी अंधार पाडा.
महावितरण चे कर्मचारी नरवडे यांच्या धाकात का ?
माजलगाव प्रतिनिधी,
पुरुषोत्तमपुरी येथील लाईट सकाळी आठ वाजल्यापासून बंद केलेली आहे रात्रीच्या नऊ वाजले तरीही चालू केलेली नाही.सुलतानपुर येथील नरवडे यांचा ऊस जाणार असल्यामुळे त्याच्या शेतातून लाईटच्या तारी केलेल्या आहेत त्यामुळे पुरुषोत्तमपुरी गावची लाईट बंद करण्यात आलेली आहे. तसेच शेतकऱ्यांना वीज पुरवठा करणारी थ्री फेज लाईट सुद्धा बंद करण्यात आलेली आहे याचा त्रास नागरिकांना व शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. एरवी पाच मिनिट पण कोणाला परमिट देत नाहीत पण धन दांडगे यांच्या उसासाठी सकाळी आठ पासून लाईट बंद केलेली असून संध्याकाळचे नऊ वाजत आहेत तरी लाईट टाकली जात नाही. यामध्ये महावितरण चे कर्मचारी यांनी हातमिळवणी केली आहे का आहे का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.त्यामुळे नागरिकांना पिण्यासाठी पाणी सुद्धा नाही व जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही आशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच खेडेगावातील छोटे-मोठे उद्योग यांना पण याचा फटका बसलेला आहे त्यामुळे लोकांमधून चर्चा येत आहे की श्रीमंताचा आला गाडा आणि गरीबाच्या घरी अंधार पाडा.