-0.5 C
New York
Saturday, February 8, 2025

Buy now

spot_img
spot_img

प्रशासकीय अडचण असल्यास सरळ मला फोन करा : तहसीलदार चंद्रकांत शेळके

◼️पारगाव सिरस येथील बैठकीत साधले सर्वसामान्य शेतकऱ्यांशी हितगुज

   

 बीड, महाराष्ट्र आरंभ वृत्त : शुक्रवार दिनांक 06 डिसेंबर रोजी पारगाव सिरस मंडळाची मंडळ स्तरीय बैठक बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली . प्रभारी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ , निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी , बीडच्या उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठकीत प्रशासकीय योजना व प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात आला .

या बैठकीला मंडळातील नागरिक , शेतकरी , मंडळ अधिकारी , तलाठी , ग्रामसेवक , कृषी सहायक , बी एल ओ , पोलीस पाटील , स्वस्त धान्य दुकानदार , अंगणवाडी सेविका इ उपस्थित होते . सर्वप्रथम तहसीलदार शेळके यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व बैठकीस सुरुवात केली . पारगाव सिरसच्या मंडळ अधिकारी स्मिता गुंजाळ व गावकरी यांच्या वतीने शाल , श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले . बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी हे नेहमी सांगत असतात की तहसीलदार यांनी प्रत्यक्ष गावकऱ्यांशी चर्चा करून अडचणी सोडविल्या पाहिजेत . त्यास अनुसरून शेळके यांनी बैठकीस सुरुवातीस मंडळातील उपस्थित शेतकरी , सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याबाबत तहसीलदारांनी संबंधित अधिकारी कर्मचारी यांना सूचना दिल्या . गावातच तहसीलदार यांनी स्वतः अडचणी ऐकून घेतल्या व निराकरण करण्याचा प्रयत्न केला म्हणून गावाकऱ्यांनी समाधान व्यक्त केले . त्यानंतर कृषी विभागाचे कृषी सहाय्यक यांच्या कामकाजाचा आढावा घेऊन शेतकऱ्यांपर्यंत योजना लवकरात लवकर पोचवाव्यात , पारदर्शकपणे शेतकऱ्यांची कामे करावी अशा सूचना तहसीलदार यांनी केल्या . त्यांनतर उपस्थित ग्रामपंचायत अधिकारी यांच्या कामकाजाचा आढावा तहसीलदार शेळके यांनी घेतला . ग्रामपंचायत अधिकारी यांनी नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविल्या पाहिजेत त्यांना सोयी सुविधा पुरविल्या पाहिजेत वसुली वेळेवर केली पाहिजे इत्यादी सूचना यावेळी दिल्या .

पारगाव सिरस मंडळातील समाविष्ट गावातील लोकांनी स्मशानभूमी चे प्रश्न मांडले . त्यावर ग्रामसेवक यांना तत्काळ जागा उपलब्ध करुन देण्यासाठी तहसीलदार यांनी आदेश दिले . त्यानंतर स्वस्त धान्य दुकानदार यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला . एकही पात्र लाभार्थी रेशन मिळण्यापासून वंचित राहू नये अशा सक्त सूचना स्वस्त धान्य दुकानदार यांना तहसीलदार शेळके यांनी दिल्या.

त्यानंतर तहसीलदार यांनी उपस्थित पोलीस पाटील यांच्याही कामकाजाचा आढावा घेतला . त्यांना काही प्रश्न विचारले व गावात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखावी अशा सूचना दिल्या . त्यानंतर शेळके यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ( बी एल ओ ) यांना नवीन नाव नोंदणी संदर्भात सूचना यावेळी दिल्या .

उपविभागीय अधिकारी कविता जाधव ह्या नेहमी शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी सजग असतात . त्या नेहमी अशा प्रकारच्या सूचना देत असतात . त्यांच्या सूचनेनुसार तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याशी गावागावातील सर्व प्रश्नावर चर्चा केल्या . त्यामध्ये प्रामुख्याने अनुदानापासून कोणीही पात्र शेतकरी वंचित राहू नये , अशा सूचना त्यांनी केल्या . तसेच सलोखा योजनेचा प्रचार प्रसिद्धी करण्यावर भर द्यावा असे यावेळी तहसीलदार शेळके यांनी सांगितले . मंडळ अधिकारी, तलाठी यांना सूचना करताना तहसीलदार शेळके यांनी आवर्जून सांगितले की नियमानुसार जे फेरफार मंजूर करणे योग्य असतील ते तात्काळ मंजूर करावे . कोणताही फेरफार प्रलंबित ठेवण्यात येऊ नये , सर्व गट जुळवण्यात यावेत असे स्पष्ट केले . नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही यासाठी प्रयत्नशील राहावे , असेही सुचविले . डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बोलताना तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी नमूद केले की

भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ , अर्थशास्त्रज्ञ , राजकारणी , तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते . त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली , तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले . ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री , स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री , भारतीय संविधानाचे शिल्पकार , भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते . देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना ‘आधुनिक भारताचे शिल्पकार’ किंवा ‘आधुनिक भारताचे निर्माते’ असेही म्हणतात .

तहसीलदार शेळके यांनी मंडळ विभागात स्वतः येऊन शेतकऱ्यांच्या अडी अडचणी जाणून घेतल्या व त्यावर उपाययोजना केल्या . यावेळी पारगाव सिरसच्या मंडळ अधिकारी स्मिता गुंजाळ , पारगाव सिरस सजाचे तलाठी विजय बहिर , साक्षाळपिंप्री सजाचे तलाठी यशवंत सानप , केतुराचे तलाठी उत्तरेश्वर खांडे , खापर पांगरी सजाच्या तलाठी ज्योती अडागळे , मंडळातील पोलीस पाटील , कृषी अधिकारी , कृषी सहायक , मतदान केंद्रस्तरीय अधिकारी , पोलीस पाटील व ग्रामसेवक उपस्थित होते .

बैठक संपन्न झाल्यावर तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी शेतकरी दस्तगीर इब्राहीम पठाण यांच्या मौजे पारगाव सिरस येथील गट क्रमांक 39 मधील गहू पिकाच्या पिक पाहणी नोंदणीचे प्रात्यक्षिक करून दाखवले व मार्गदर्शन करून ऑनलाईन ई पीक पाहणी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर करावी असेही शेतकऱ्यांना आवाहन केले .

यावेळी अधिकची माहिती देताना शेळके म्हटले की ई पीक पाहणीच्या कालावधीमध्ये कार्यक्रमांमध्ये वेळापत्रकामध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे . नोव्हेंबर पासून सुरु होणारी ई पीक पाहणी आता एक डिसेंबरपासून सुरू करण्यात आली आहे . एक डिसेंबर 2024 ते 15 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना आपल्या रब्बीच्या पिकांची पाहणी करता येणार आहे . त्यानंतर 16 जानेवारी 2025 ते 28 फेब्रुवारी 2025 या lकालावधीमध्ये सहाय्यक स्तरावरील ई पीक पाहणी केली जाणार आहे . शेतकऱ्यांच्या माध्यमातून ई पिक पाहणी करत असताना DCS ॲपच्या माध्यमातून ई पिक पाहणी केली जाणार आहे . ती करत असताना तंतोतंत जिओ फेन्सिंग च्या माध्यमातून होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःच्या गटांमध्ये उभे राहूनच ई पाहणी करावी लागणार आहे . अशा प्रकारची ई पिक पाहणी केल्यानंतर त्यातील 10% ई पिक पाहणी ही ग्राम महसूल अधिकारी यांच्या माध्यमातून तपासली जाणार आहे . अशा प्रकारच्या कार्यक्रमासह आता रब्बी हंगाम 2024 ची ई पिक पाहणी 1 डिसेंबर 2024 पासून करण्यात येत आहे आणि ई पिक पाहणी केल्यानंतर जर त्यामध्ये काही दुरुस्ती असेल तर या दुरुस्तीच्या संदर्भातील नवीन मार्गदर्शक सुद्धा देखील निर्गमित करण्यात आल्या आहेत .

यावेळी सरपंच जानकाबाई जमदाडे, उपसरपंच श्रीकांत नवले , दिनकर जमदाडे , रामकिसन वाटमोडे , अनुरथ कणसे , बबन खोड , अशोक नवले , लुखमान सय्यद , रुस्तुम ठोंबरे , हनुमंत नवले , दस्तगीर पठाण , मोतीराम नवले , शहादेव गव्हाणे , नाना ठोंबरे , सुभाष सातपुते व पारगाव सिरस मंडळातील इतर नागरिक उपस्थित होते .

उपस्थित नागरिकांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना नमूद केले की अशाप्रकारे तहसीलदार यांनी स्वतः गावात येऊन सर्व विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेण्याची व प्रश्न मार्गी लावण्याची ही पहिलीच वेळ आहे . अशा प्रकारे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी जनतेची कामे केल्यास जनतेला निश्चितच दिलासा मिळेल , हे मात्र निश्चित

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या