अंबाजोगाई, महाराष्ट्र आरंभ वृत्त : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येथील योगेश्वरी नूतन विद्यालयात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सहशिक्षक तथा इंग्रजी विषय विभाग प्रमुख बालासाहेब मसने यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सामाजिक क्रांतीपट उलगडून दाखवला.
प्राचीन कालखंडापासून मानवी समाज हा सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय संघर्षाचा राहिलेला आहे. जात, वर्ण, पंथ, धर्म असे मानवनिर्मित वेगवेगळे भेद माणसाला माणसापासून दूर करत आलेले आहेत. आधुनिक कालखंडात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून सर्वच समाज घटकांना समतेचा मार्ग आणि सर्वांगीण विकासाच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत असे विचार बालासाहेब मसने यांनी आपल्या व्याख्यानात व्यक्त केले.
याप्रसंगी विचार मंचावर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अपर्णा पाठक , उपमुख्याध्यापक विलास गायकवाड, पर्यवेक्षक आर.एस. मठपती व्ही व्ही कुलकर्णी व सांस्कृतिक विभाग प्रमुख बी.आर.मसने हे उपस्थित होते.