◼️मातंग समाज संघटनेचे नेते किशोर अडागळे यांची मागणी
पाटोदा प्रतिनिधी, महाराष्ट्र आरंभ वृत्त :विधान सभेच्या निवडणुकीत भाजप महायुतीने मोठे यश मिळविले आहे.यामध्येआष्टी,पाटोदा,शिरुर विधानसभा मतदार संघातुन माजी मंत्री सुरेश धस यांनी ७८ हजाराच्या फरकाने दणदणीत विजय संपादन केला आहे.आ.सुरेश धस यांनी यापूर्वी तीन वेळा विधानसभेचे नेतृत्व केलेले आहे.एक वेळा बीड- लातुर-धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून विधानपरिषदेचे आमदार म्हणुन काम केलेले आहे.त्यांच्याजवळ आमदारकीच्या चार टर्मचा दांडगा अनुभव आहे.त्यांचा जनसंपर्क सुद्धा खूप मोठा आहे.लोकशाही आघाडी सरकारच्या काळात त्यांनी महसूल व पुनर्वसनसह अनेक
खात्याचे राज्य मंत्रीपदसुद्धा भूषविले आहे.आ.सुरेश धस यांनी मंत्रिपदाच्या काळात अतिशय उत्तम असे काम केलेले आहे.याच दरम्यान उत्तराखंडमध्येआलेली पर परिस्थिती असो की,आष्टी मतदार संघात पडलेला दुष्काळ असो आ.सुरेश धस यांनी आपल्या कौशल्याचा वापर करून ही परिस्थिती उत्तमपणेहाताळलेल्या होती.
मराठवाड्यातील ऊसतोड कामगारांचे प्रश्न असो की,पाणी प्रश्न हा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला प्रश्नसुद्धा आ.सुरेश धस यांनी वेळोवेळी पोटतिडकेने
सभागृहात मांडलेला आहे.विशेष म्हणजे कोरोना महामारीच्या काळातसुद्धा महाराष्ट्रात सर्वात जास्त कोविड सेंटर आ.सुरेश धस यांनी चालविले आणि त्यातून हजारो लोकांना या महाभयंकर संकटातून वाचविले होते.आ.सुरेश धस यांची ग्रामीण भागातील जनतेशी अतिशय घट्ट अशी नाळ जुळली आहे. हे कालच्या विधानसभा निवडणुक निकालावरून सिद्ध होते. मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रश्नांचा त्यांना अत्यंत बारकाईने अभ्यास आहे.त्यामुळे भारतीय जनता पार्टीने जनसामान्यांच्या मताचा आदर करीत आ.सुरेश धस यांना योग्य ते स्थान द्यावे अशी मागणी आ. सुरेश धस यांचे कट्टर समर्थक तथा पाटोदा नगरपंचायत चे सभापती किशोर अडागळे,माजी जि.प. सदस्य लालासाहेब शिंदे,नवनाथ चखाले,भगवान भोसले,फक्कड वाल्हेकर,नागेश डाडर,रावसाहेब मोरे,दत्ता साठे, बाबासाहेब पुलावळे,संतोष लोंके यांनी केली आहे.