10.7 C
New York
Wednesday, November 20, 2024

Buy now

spot_img
spot_img

सोळंके कारखान्याची दादागिरी छत्रपतीने मोडून काढली

◾मतदार संघाच्या विकासासाठी मोहन जगतापला संधी द्या

◾दिंद्रुड सर्कलच्या मेळाव्यात माजी आ.बाजीरावभाऊ यांचे आवाहन

माजलगाव महाराष्ट्र आरंभ वृत्त : आ. प्रकाश सोळंके यांनी उसाचे राजकारण करत मतदार संघात आपली दादागिरी निर्माण केली होती.शेतकऱ्यांचा छळ केला आहे. परंतु आम्ही छत्रपती सहकारी साखर कारखाणा निर्माण करून सोळंके कारखान्याची दादागिरी मोडून काढली आहे.शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिलं आहे.त्यामुळे मतदार संघाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर मोहन जगताप यांना निवडून द्यावे असे आवाहन माजी आ.बाजीरावभाऊ जगताप यांनी केले.दिंद्रुड सर्कलच्या मेळाव्यात ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर नारायण डक,भाई थावरे,सहाल चाऊस,नितीन नाईकनवरे,कॉ. बाबा,दयानंद स्वामी,नारायण होके, नारायण गोले,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना बाजीराव भाऊ म्हणाले की,माजलगाव मतदार संघाची पूर्ती वाट प्रकाश सोळंके यांनी लावली आहे. विकासाच्या नावाखाली या ठिकाणी भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे.सुडाचं राजकारण केलं आहे.छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निर्मितीपूर्वी मतदार संघातील तमाम शेतकऱ्यांना त्यांच्या जुलमी कारभाराचा अनुभव आहे.शेतकऱ्यांच्या उसाला योग्य भाव न देणे,मापात पाप करणे, इत्यादी प्रकारे शेतकऱ्याची आडवनुक केली आहे.त्यांचा ऊस बांधावर वाळवला आहे.परंतु छत्रपती सहकारी साखर कारखान्याने येथील शेतकऱ्यांना चांगले दिवस अनुभवायला आले आहे.ही वस्तुस्थिती असल्याचे त्यावेळी म्हणाले.त्यामुळे माजलगाव मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी मोहन जगताप हा सक्षम पर्याय आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आपण प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.यावेळी आयोजित मेळाव्याला परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या