बीड (प्रतिनिधी) बीड शहरापासून जवळ असलेल्या इमामपूर शिवारामध्ये गेल्या अनेक महिन्यापासून अवैध मुरूम उत्खनन मुरूम माफिया करत होते. याकडे महसूल प्रशासनाचे व पेठ बीड पोलीस अर्थपूर्ण गोष्ट होत असल्यानेच राजरोस, दिवसा ढवळ्या मुरूम उत्खनन व वाहतूक करत होते. याकडे मंडळ अधिकारी तलाठी व पोलीस प्रशासन यांचे दुर्लक्ष होत असल्याने बिनधास्त मुरूम उपसा, वाहतूक केली जात होती. त्यामुळे महसूल प्रशासनाचा लाखोंचा महसूल बुडत होता. तसेच या भागातून भरधाव विना नंबर चे वेगान टिप्पर वेगाने जात असल्याने, एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती, धुळीमुळे श्वसनाचे रोग होत असल्याने, या इमामपूर दोन शाळा असल्याने विद्यार्थ्यांना देखील या मुरूम वाहतूक करणाऱ्या वाहनापासून धोका होता या भागातील रहिवाशांनी याआधी तक्रारी देऊन देखील याची दखल महसूल प्रशासनाकडून, बीड बीड पोलीस ठाण्याकडून घेतली गेली नव्हती. दिनांक 5 नोव्हेंबर रोजी दुपारी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पी.एस.आय. बाळराजे दराडे यांनी इमामपूर शिवारात उत्खनन होत असलेल्याची माहिती मिळाली असता त्या ठिकाणी जाऊन तीन हायवा मध्ये मुरूम आढळल्याने त्या हायवा ताब्यात घेऊन पोलीस मुख्यालयात लावण्यात आल्या. तसेच आज पहाटे वाळू वाहतूक करणाऱ्या दोन वाहने ताब्यात घेतली. ही कारवाई बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय बाळराजे दराडे, psi राठोड, पो. आनंद मस्के, पो. ह. अतिश मोराळे, कृष्णा जायभाय, सतीश मुंडे, नामदेव सानप यांनी केली.