अरेबियन ज्वेलर्सवर कारवाई करण्यास शहर पोलिसांकडून टाळाटाळ : प्रा.सचिन उबाळे
दोन दिवसात कारवाई न केल्यास आंदोलन करणार
बीड (प्रतिनिधी): अरेबियन ज्वेलर्स नावाने शहरात मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक व मनी लॉन्ड्रींग होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या प्रकरणी स्वाभिमान संघटना जिल्हाप्रमुख तथा ठेवीदार संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य मुख्य प्रवर्तक प्रा, सचिन उबाळे यांनी बीड जिल्ह्यातील सामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक थांबवण्यासाठी आज शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मात्र या प्रकरणी शहर पोलिस ठाण्याच्या अिधकाऱ्यांनी करवाई करण्यास टाळाटाळ करत हात वर केले. यामुळे दोन दिवसात पोलिसांनी अरेबियन ज्वेलर्सवर कारवाई केली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा प्रा.सचिन उबाळे यांनी दिला आहे.
अरेबियन ज्वेलर्स या फर्मच्या नावाखाली शहरातील जनतेला मोठ्या प्रमाणात कार, गाड्या व सोने मिळेल असे अमिष दाखवून मोठ्या प्रमाणात पैसे उखळले जात आहेत.कोणत्याही वैध सरकारी परवानगीशिवाय लॉटरीच्या कुपनांची विक्री करण्यात येत आहे. शिवाय बीड शहरात २५ ऑटो रिक्षामार्फत अरेबियनचा प्रचार करुन नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप प्रा.उबाळे यांनी केला आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर ठाण्याचे पाेलिस अिधकाऱ्यांनी या प्रकरणी हात वर केलेआहेत. अरेबिरयन विरुध्द कोणताही गुन्हा नोंद नसल्याने आम्ही त्यांच्यावर कारवाई करु शकत नाहीत असे म्हणत पोलिसांनी कारवाई करण्यास टाळाटाळ केली आहे. वास्तविक पाहता उबाळे यांनी पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट्स ऑफ डिपॉझिटर्स (एमपीआयडी) अॅक्ट १९९९ व प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिग अॅक्ट २००२ अंतर्गत गुन्हा नोंदवून मेहबूब मलिक यांच्या विरोधात कडक कार्यवाहीची मागणी केली आहे. याशिवाय, भारतीय दंड संहिता कलम ४२० (फसवणूक), ४०६ (विश्वासघात) आणि ३४ (सामूहिक गुन्हा) अंतर्गत गुन्हा नोंदवण्याचे आवाहन केले आहे. मात्र बीड शहर पोलिस गुन्हा नोंद होण्याची वाट पहात आहेत. यामुळे दोन दिवसात अरेबियन ज्वेलर्सवर कारवाई झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशार प्रा सचिन उबाळे यांनी दिला आहे.