11.2 C
New York
Tuesday, November 19, 2024

Buy now

spot_img
spot_img

बीड शहरात कमरेला गावठी पिस्टल लावुन फिरणाऱ्या इसमास स्था.गु.शा.ने केले जेरबंद एक गावठी गट्टा व दोन जिवंत काडतुस केले जप्त 

 

(स्थानिक गुन्हे शाखा-बीड कामगिरी

बीड शहरात कमरेला गावठी पिस्टल लावुन फिरणाऱ्या इसमास स्था.गु.शा.ने केले जेरबंद एक गावठी गट्टा व दोन जिवंत काडतुस केले जप्त 

बीड (प्रतिनिधी) मा.पोलीस अधीक्षक,बीड यांनी अवैध धंद्याविरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यावरुन पोलीस निरीक्षक श्री. उस्मान शेख स्था.गु.शा.बीड यांनी अवैध अग्निशस्त्र बाळगणारे इसमांची माहिती काढण्यासाठी अधिपत्याखालील अधिकारी यांना सुचना दिल्या आहेत. त्यावरुन स्था.गु.शा. पथक बीड शहरात पेट्रालिंग करीत असतांना पोलीस हवालदार मनोज वाघ यांना गुप्त बातमी मिळाली की, इसम नामे महादेव राज दोडके रा.सावतामाळी चौक याचेकडे पिस्टल असल्याची खात्र्ी लायक बातमी मिळाली, तेव्हा श्री. उस्मान शेख पो.नि.स्थागुशा बीड यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले तेव्हा स्थागुशा पथक तात्काळ रवाना होवुन सदर इसमाचा शोध घेण्यात सुरवात केली असता सदर इसम सावता माळी चौक येथे एक इसम मिळुन आला त्याचे नाव महादेव राजु दोडके वय 40 वर्षे रा.सावतामाळी चौक,बीड असे सांगितले त्याचे झडती घेतली असता त्याचे ताब्यात एक गावठी बनावटीची पिस्टल व दोन जिवंत काडतुस असा 42,000/- रु चा मुद्देमाल मिळुन आला आहे. सदर आरोपी विरुध्द पोह मनोज वाघ यांनी सरकार तर्फे दिलेल्या फिर्याद वरुन दिनांक 25.10.2024 रोजी पो.स्टे. बीड शहर येथे भारतीय शस्त्र् अधिनियम अन्वये गुन्हयांची नोंद करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी मा.श्री. अविनाश बारगळ पोलीस अधीक्षक,बीड , मा.श्री. सचिन पांडकर अपर पोलीस अधीक्षक बीड, पोनि श्री. उस्मान शेख स्था.गु.शा.बीड यांचे मार्गदर्शनाखाली सफौ / तुळशिराम जगताप, पोह/ कैलास ठोंबरे, मनोज वाघ, भागवत शेलार, राहुल शिंदे, विकास वाघमारे, नारायण कोरडे, अश्विनकुमार सुरवसे यांनी केलीआहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या