◼️बीड येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न पक्षाने आदेश दिल्यास सहा जागेवर लढणार- विष्णुपंत घोलप
बीड, महाराष्ट्र आरंभ वृत्त : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाच्या बीड जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक काल बीड येथे आयोजित करण्यात आली होती.बैठकीमध्ये राज्यभर चालू असलेल्या सर्व राजकीय घडामोडींची चर्चा करण्यात आली.लोकसभा निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षात सह डाव्या पक्षाच्या कुठल्याही नेत्यांनी लोकसभेसाठी हट्ट न धरता जातीवादी सरकार पटले पाहिजे या भावनेतून महाविकास आघाडीला निस्वार्थपणे मदत केली मात्र आज विधानसभेच्या वेळी जागा वाटपामध्ये शेकापच्या पारंपारिक असणाऱ्या मतदारसंघांमध्ये देखील शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेस जागा देण्यास मोठेपणा दाखत नाहीत,जाणीवपुर्वक कोंढी केली जात असल्याची चर्चा या बैठकीत करण्यात आली जर आपल्याला पारंपरिक जागा मिळत नसतील तर आपण बीड जिल्ह्यामध्ये सहाची सहा जागेवर उमेदवार देऊ असा ठरवा मांडण्यात आला, राज्यभर निवडुंन येण्याची संख्या जरी ठरावीक ठीकणी आसली तरी महाविकास आघाडीला विजयाची लागणारी मत मात्र शेतकरी कामगार पक्षाकडे आहेत, हे हे महाविकास आघाडीच्या लोकांनी विसरू नये अन्यथा आघाडीतून बाहेर पडून बीडसह मराठवाड्यातल्या जागा लढू असे भाई मोहन गुंड यांनी व्यक्त केले, यावेळी भाई विष्णुपंत घोलप , आभी लोंढे , भाई बाळासाहेब घुमरे, ॲड नारायण गोले पाटील ॲड राजेंद्र नवले, इम्रान शेख भाई अशोक रोडे, शिवाजी सुरवसे भाई मुंजा पांचाळ प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.