3.9 C
New York
Monday, December 2, 2024

Buy now

spot_img
spot_img

एकाच ठिकाणी 20 वर्षापासून कार्यरत पूर्णवादी बँकेच्या माजलगाव शाखेचे व्यवस्थापक शेंडगे चेअरमन निरंतर यांचे जावई आहेत काॽ बाळासाहेब सोनटक्के

एकाच ठिकाणी 20 वर्षापासून कार्यरत पूर्णवादी बँकेच्या माजलगाव शाखेचे व्यवस्थापक शेंडगे चेअरमन निरंतर यांचे जावई आहेत काॽ बाळासाहेब सोनटक्के

 

तेलगाव प्रतिनिधी

सहकार मध्ये कोण. कधी काय करेल याचा नेम नाही मीच सर्वोच्च अशा अविर्भावात काही मंडळी असतात अन पदाचा पुरेपूर कसा फायदा घेऊन शासनाच्या नियम कसे देशोधडीला लावतात याचा उत्तम नमुना म्हणजे पूर्णवादी बँकेचे व्यवस्थापन मंडळ म्हणता येईल

पूर्णवादी बँकेत संचालक मंडळाचे एकतर्फी बहुमत असल्याने चेअरमन डॉक्टर निरंतर मनमानी कारभार करत असुन गेल्या अनेक वर्षापासून मनमानीने कळस चढविला आहे. माजलगाव शाखेत पूर्वी लिपिक व नंतर शाखा व्यवस्थापक म्हणून कर्तव्य बजावत असलेले शेंडगे यांना तब्बल वीस वर्षापासून एकाच ठिकाणी ठेवून रिझर्व बँक आणि सहकार विभागाच्या डोळ्यात चटणी टाकली आहे. सहकारी बँकेत कार्यरत असलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याची बदली किमान तीन ते चार वर्षात करणे क्रमप्राप्त असतानाही पूर्णवादी बँकेचे चेअरमन स्वतः स्वतःचे नियम तयार करत असल्याने बँकेत एक प्रकारे जहागिरी निर्माण झाल्याचे वातावरण दिसून येत आहे. माजलगाव शाखेने ठराविक लोकांचे. समाजाचेच कर्जप्रकरणे मंजूर करून इतरांना मात्र ठेंगा दाखवण्याचे काम सातत्याने होत असल्याने ज्यांना कोणी वाली नाही त्यांना जीव घेणे कसरत करावी लागते वरिष्ठ मंडळी मूग गिळून गप्प काॽ असा प्रश्न पडत आहे. माजलगाव शाखा कोणा एका व्यक्तीला आदंण तर केली नाही अशीही जोरदार चर्चा सुरू आहे एकाच ठिकाणी कोणत्या नियमाने शेंडगे ला वीस वर्षापासून ठेवले त्याचे गुपित जगासमोर येणे गरजेचे असुन शेंडगे हा चेअरमन डॉक्टर निरंतर यांचे जावई आहेत का ॽ असा प्रश्न सत्यशोधक ओबीसी परिषद धारूर तालुका अध्यक्ष बाळासाहेब सोनटक्के यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या