22.8 C
New York
Monday, April 28, 2025

Buy now

spot_img
spot_img

शेतकऱ्यांचे श्रम कमी व्हावेत यादृष्टीने राज्यात ‘ड्रोन मिशन’ राबविण्यात येणार असून याचाच एक भाग म्हणून कृषी विद्यापीठांमधून याबाबतचा स्वतंत्र डिप्लोमा कोर्स सुरू करण्यात आला आहे, याचा शेतकऱ्यांना नक्कीच लाभ होईल, असेही धनंजय मुंडे

शेतीत ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्याची शक्यता तपासून आता शेतकऱ्यांचे श्रम कमी व्हावेत यादृष्टीने राज्यात ‘ड्रोन मिशन’ राबविण्यात येणार असून याचाच एक भाग म्हणून कृषी विद्यापीठांमधून याबाबतचा स्वतंत्र डिप्लोमा कोर्स सुरू करण्यात आला आहे, याचा शेतकऱ्यांना नक्कीच लाभ होईल, असेही धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले.

प्रतिनिधी –

धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 20 हजार रुपयांची मदत 2 हेक्टरच्या मर्यादेत करण्याची घोषणा धनंजय मुंडे यांनी यावेळी केली, तसेच यासाठी 1 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचेही ते म्हणाले.

 

छत्रपती शिवाजी महाराज नेहमी म्हणत ‘शेतकरी सुखी तर रयत सुखी आणि रयत सुखी तर राज्यकर्ते सुखी!’ शेतकऱ्याला त्रास होऊ नये असे त्यांचे धोरण होते, त्याला अनुसरूनच आमचे हे सरकार प्रामाणिकपणे काम करत आहे, असे धनंजय मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी धनंजय मुंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे अज्ञापत्रच सभागृहात वाचून दाखवले.

 

या उत्तरानंतर धनंजय मुंडे यांनी दिलेल्या सविस्तर व मुद्देसूद उत्तराबद्दल विधानपरिषद सदस्य आ.प्रवीण दरेकर आ.प्रसाद लाड यांनी धनंजय मुंडे यांचे अभिनंदन व कौतुक केले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या