20.8 C
New York
Thursday, September 18, 2025

Buy now

spot_img
spot_img

अॅड प्रकाश आंबेडकर यांच्या आक्टोंबर महिन्यात सभेचे आयोजन सर्वांनी उपस्थित राहाण्याचे आव्हान – अशोक हिंगे

ॲड प्रकाश आंबेडकर यांची ऑक्टोबर महिन्यात बीड येथे सभेचे

आयोजन,सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन – अशोक हिंगे

 

 

माजलगाव तालुक्यातील निपाणी टाकळी येथील वंचित बहुजन आघाडीच्या शाखा उद्घघाटन प्रसंगी मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांची माहिती.

 

माजलगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे निपाणी टाकळी जयभिमनगर येथे

वंचित बहुजन आघाडीचे शाखेचे भव्य उद्घघाटन दि.0३/०९/२०२३ वार रविवार रोजी सायं. ५.०0 वा.

मा.अशोकभाऊ हिंगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष जि.सहसचिव, बीड अंकुश (अण्णा) जाधव हे होते तर कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून मा.भारत तांगडे (उपजिल्हाध्यक्ष, हे होते , तसेच पत्रकार बालाजी जगतकर, पुरुषोत्तम वीर,पत्रकार सुभाष बोराडे, सचिन उजगरे, शतुध्न कसबे,यांची उपस्थिती होती तर राजरत्न खळगे यांनी कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन केले तर युवा तालुका अध्यक्ष राजेश विघ्नें यांनी कार्यक्रमांचे आभार मानले. तर शाखेचे नियोजन अशोक पोळ यांनी केले.पुढे शाखेच्या उद्घघाटन प्रसंगी बोलताना अशोक हिंगे यांनी सांगितले की, राज्यभरातील अन्याय अत्याचाराची परिस्थिती पाहता.ॲड बाळासाहेब आंबेडकर हे समाज संरक्षणार्थ चौफेर फिरत असुन, त्यांना खंभीर साथ देण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी काम करत राहणे महत्वाचे आहे. तसेच बाळासाहेब आंबेडकर यांनी देखील ऑक्टोंबर महिन्यात बीड येथे होऊ घातलेल्या सभेला हजर राहण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे सर्वांनी ऑक्टोंबर महिन्यात जी तारीख अंतिम ठरेल त्या तारखेस प्रचंड संख्येने उपस्थित राहुन बाळासाहेब आंबेडकर यांना खंबीर साथ देण्याचे आव्हान मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांनी केले आहे.

तसेच निपाणी टाकळी येथील वंचित बहुजन आघाडीच्या शाखा उद्घाटन प्रसंगी तालुका‌‌ पदाधिकारी गावातील शाखेचे पदाधिकारी व कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.निपाणी टाकळी येथील शाखेत काम करणाऱ्या शाखा पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालून सत्कार व सन्मान करण्यात आला व कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या