7.2 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

spot_img
spot_img

स्थानिक गुन्हे शाखा बीडची मोटरसायकल चोरी करणारा आरोपी केला जेलबंद चार मोटरसायकल केल्या जप्त पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांची उल्लेखनीय कारवाई

स्थानिक गुन्हे शाखा बीडने मोटरसायकल चोरी करणारा आरोपीचे बंद करून चार मोटरसायकल केल्या जप्त.

माननीय पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड संतोष साबळे यांनी पोलीस ठाणे शिरूर गुन्हा रजिस्टर नंबर 104/2023 कलम 379 भावी मधील मोटरसायकल चोरीच्या पुण्यातील आरोपी शोध घेणे कामी आदेश दिल्याने पोलीस उपनिरीक्षक श्री तुपे यांना गोपनीय माहिती मिळाली की सदर गुन्ह्यात चोरी गेलेल्या मोटरसायकल ही समीर हसमुद्दीन शेख राहणार पाथर्डी याने दीड महिन्यापूर्वी एक स्प्लेंडर मोटरसायकल चोरी गेल्याची माहिती मिळताच आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली सदर आरोपी हा लातूर येथे गेल्याची माहिती मिळाल्याने त्यास लातूर येथे जाऊन ताब्यात घेण्यात आले त्यानंतर त्यास चोरलेल्या मोटरसायकल संदर्भात विचारणा केली असता त्याने मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली असून मीठ सांगवी येथे राहते घरांचे बाजूला ठेवल्याचे सांगितले वरून त्याचे ताब्यातून उपरोक्त गुन्ह्यातील मोटार सायकल सह इतर तीन मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत खालील नमूद गुन्ह्यात मोटरसायकल चोरी गेल्याचे निष्पन्न झाले आहे 1) पोलीस ठाणे शिरूर गुन्हा रजिस्टर नंबर 104/2023 भादवी.

2) पोलीस ठाणे परतुर जालना गुन्हा रजिस्टर नंबर 226/2018 कलम 379 माधवी.

आरोपी नामे समीर हसमुद्दीन शेख वय 35 राहणार पाथर्डी जिल्हा अहमदनगर यास पोलीस स्टेशन शिरूर यांचे ताब्यात देण्यात आले असून उर्वरित दोन मोटरसायकल कोणत्या गुन्ह्यात चोरी केलेले आहेत याचा शोध शिरूर पोलीस स्टेशनचे व स्थानिक गुन्हा गुन्हे शाखेचे मार्फत चालू आहे सदर आरोपीकडून इतर मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड केस येण्याची शक्यता आहे

दर ची कामगिरीही माननीय श्री नंदकिशोर ठाकूर पोलीस अधीक्षक बीड माननीय श्री सचिन पानकर अप्पर पोलीस अधीक्षक बीड यांचे मार्गदर्शनाखालीLcbचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे, पोलीस उपनिरीक्षक संजय तुपे, सफौ/तुळशीराम जगताप, पोह/कैलास ठोंबरे,नसिर शेख, भागवत शेलार, अशोक लुबाडले, राहुल शिंदे, विकी सुरवसे, चालक मराडे, यांनी केली आहे

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या