12.6 C
New York
Saturday, May 23, 2026

Buy now

spot_img
spot_img

बीड शहरातील सराईत गुन्हेगार नाझिया शेखवर सहा महिन्यांची हद्दपारी.

  1. बीड शहरातील सराईत गुन्हेगार माझिया शेखवर सहा महिन्यांची हद्दपारी.

 

बीड,  आरंभ वृत्तसेवा- बीड उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाने शहरातील मोमिनपुरा, पेठ बीड येथील रहिवासी शेख नाजीया शेख पाशा (वय 35) यांच्याविरुद्ध मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 56(1)(अ) अंतर्गत हद्दपारीचा आदेश जारी केला आहे.

 

पोलीस अधीक्षक बीड यांच्या प्रस्तावानंतर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी केलेल्या चौकशी अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. संबंधित व्यक्तीविरुद्ध विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे तसेच त्याच्या वर्तनामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

 

आदेशानुसार शेख नाजीया शेख पाशा यांना बीड जिल्ह्याच्या हद्दीबाहेर सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले असून या कालावधीत उपविभागीय दंडाधिकारी यांच्या पूर्वपरवानगीशिवाय बीड जिल्ह्यात प्रवेश करता येणार नाही. आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

 

हद्दपारीच्या कालावधीत संबंधित व्यक्तीने वास्तव्याचा पत्ता बदलल्यास जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती देणे बंधनकारक राहणार आहे. तसेच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी किंवा न्यायालयीन सुनावणीसाठी आवश्यक असल्यास पूर्वपरवानगी घेऊन संबंधित व्यक्तीस जिल्ह्यात प्रवेश करता येईल.

 

हा आदेश उपविभागीय दंडाधिकारी, बीड यांनी 20 मे 2026 रोजी जारी केला आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या