13 C
New York
Thursday, October 23, 2025

Buy now

spot_img
spot_img

मनाच्या शुद्धतेनेच माणूस शीलवंत आणि सदाचारी होतो…. पूज्य भंते धम्मशील थेरो

मनाच्या शुद्धतेनेच माणूस शीलवंत आणि सदाचारी होतो…. पूज्य भंते धम्मशील थेरो

 

(सम्यक संबुद्ध विहार नागोबा गल्ली येथे वर्षावास समापन धम्मदेशनेने संपन्न )

 

बीड (प्रतिनिधी) पूज्य डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली ऐतिहासिक चंपावती नगरी बीडला लाभलेले पूज्य भन्ते धम्मशील थेरो यांच्या अथक प्रयत्नाने मौजे शिवनी येथे स्थापन झालेल्या प्रियदर्शी धम्म संस्कार शिक्षण संस्थेच्या माध्यमातून बीड परिसरात व बीड जिल्ह्यात धम्माचे अनेक कार्यक्रम संपन्न होऊन धम्ममय वातावरण निर्माण झालेले आहे भन्ते धमशील थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली बहुतांश विहारात वर्षावास काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित “बुद्ध आणि त्यांचा धम्म”या ग्रंथाचे वाचन नियमित 3 महिने करण्यात आले. त्यामुळे बुद्ध धम्म समजावून घेण्यास सामुदायिक गती मिळाली.धम्मग्रंथ वाचन समापन प्रसंगी अनेक विहारात पूज्य धम्मशील यांच्या धम्मदेशनेचा लाभ बहुसंख्येने उपासक उपासिका व बालक बालिकांना मिळाला. मनाच्या शुद्धतेनेच माणूस शीलवंत आणि सदाचारी होतो असे सम्यक संबुद्ध विहार नागोबा गल्ली बीड येथे पूज्य भन्ते धम्मशील थेरो यांनी धम्मदेशने प्रसंगी प्रतिपादन केले.

ह्या प्रसंगी सर्वप्रथम बीड शहरातील डॉ. बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पूज्य भिक्खू संघाच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून विनम्र अभिवादन करून त्रिशरण पंचशील ग्रहण केल्यानंतर सवाद्य धम्मरॅली काढून पेठ बीड मधून चांदणे वस्ती (अण्णाभाऊ साठे नगर) मार्गे नागोबा गल्लीतील विहारात पोहोचली. तेथे विहारात तथागत व आदर्शांचे पूजन भन्ते च्या हस्ते करण्यात आले. ग्रंथ वाचन करणाऱ्या व नियमित उपस्थित राहणाऱ्या उपासीकांच्या हस्ते पूज्य भन्तेचे पुष्प पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून त्रिवार वंदन करण्यात आले. सामुदायिक त्रिशरण पंचशीला नंतर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक राजू जोगदंड यांनी केले. भन्ते धम्मबोधी (शिवनी )यांनी वर्षावासाबद्दल माहिती दिली तर श्री परमेश्वर बनकर यांनी वंचित समाजाकरता महापुरुष फुले, शाहू,आंबेडकर यांनी केलेल्या कार्याबद्दल माहिती दिली.

नियमित ग्रंथ वाचणाऱ्या उपासिका पैकी प्रातिनिधीक स्वरूपात उपासिका शितल जोगदंड, निशा कांबळे व चंद्रकला जोगदंड यांना “बुद्ध आणि त्यांचा धम्म” चे 3 ग्रंथ “वाचाल तर वाचाल” मोफत वाचनालया तर्फे पूज्य भन्तेच्या हस्ते वाटप करण्यात आले.

आपल्या सुमधुर वाणीतून श्रवणीय धम्मदेसनेत पूज्य भन्ते धम्मशील पुढे म्हणाले की डॉ. बाबासाहेबांनी बुद्ध धम्मच का स्वीकारला कारण बुद्ध धर्म हा मूळ भारतीय धम्म आहे की ज्या धम्माने मानव हा केंद्रबिंदू मानून माणसाने माणसाशी माणसासारखे कसे वागावे ही समजते.धम्म आचरणाने समता, बंधुता, न्याय मैत्री, करुणा निर्माण होते व धम्म म्हणजे नीती व नीती म्हणजे धम्म जो की अनेक कर्मकांड अनिष्ट रूढी परंपरा, स्वर्ग, नरक ह्या भाकड कथेपासून अलिप्त राहून वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून मिळालेल्या प्रज्ञेला शिलाची व सदाचाराची जोड देणे कसे गरजेचे आहे व अनित्यवाद, कुशल कर्माचे फळ याबद्दल तथागतांच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगून अत्यंत सोप्या भाषेत पालीतील तथागतांच्या उपदेशाचे सार समजावून सांगितले.

डॉ. बाबासाहेबांनी परदेशात अतिउच्च शिक्षण घेऊनही त्यांनी व माता रमाईने आपले संपूर्ण आयुष्य वंचित शोषितांच्या व देशाच्या कल्याणा करता झिजवीले. त्यांचा हा त्याग म्हणजेच हे सुदिन लाभले हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. त्त्यांच्या त्यागा मुळेच आजचे हे वैभवाचे दिवस आपल्याला प्राप्त झाले आहेत.

त्यांनी दाखवलेल्या व दिलेल्या धम्माने दुःखमुक्तीचा मार्ग दाखविला व अंधारातून प्रकाशाची व प्रगतीची वाट दाखवीली,ती अंगीकारणे व धम्मकार्यात सहभाग नोंदवून तन-मन-धनाने कार्य करणे कसे गरजेचे आहे हे स्पष्ट केले.मानव शक्ती म्हणजे प्रज्ञा व शिलाच्या जोरावर माणसातील ताकद जागृत करणे हा तथागतांचा बहुमोल उपदेश म्हणजे ज्ञानाने विकास होणे,अज्ञान नष्ट करणे म्हणेज दुःख मुक्तीची वाटचाल करणे होय हे सर्व उपस्थितांना स्पष्ट केले. धम्मदेशना संपूच नये असे सर्व उपासक उपासिकांना मनापासून वाटत होते.सर्वजण मनःपूर्वक तल्लीन होऊन शांतचित्ताने धम्मदेशनेचा लाभ घेत होते.शेवटी आशीर्वाद गाथा व सरणातयने कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आयु. आदर्श जोगदंड यांनी व्यक्त केले. खीरदान व भोजनदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमास परिसरातील व शहरातील बहुसंख्य उपासक उपासिका व बालकांची उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या