◾छत्रपती मल्टीस्टेट या शाखेसमोर गळफास घेऊन आत्महत्या
◾धक्कादायक पाऊल उचलल्याने सहकार क्षेत्रात खळबळ
गेवराई, महाराष्ट्र आरंभ न्यूज : खासगी बँकेच्या त्रासांला कंटाळून खळेगाव ता. गेवराई जिल्हा बीड येथिल एका ठेविदांराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. छत्रपती मल्टीस्टेट या शाखेसमोर गळफास लावून आपले जीवन संपवले आहे. आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शहरातील जुने बस स्टॅन्ड समोर ही दुर्दैवी घटना घडली असून त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
गेवराई येथील छत्रपती मल्टीस्टेट या ठेविदारांला पैसे देण्यास शाखेकडून टाळाटाळ होत असल्याने खळेगाव ( ता.गेवराई ) येथील खातेदार सुरेश आत्माराम जाधव वय वर्ष, ४० यांनी खाजगी बँकेच्या समोर गळफास घेवून आत्महत्या केली. या घटनेमुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली असून खाजगी बँक प्रशासन खडबडून जागे झाले आहेत. सविस्तर वृत्त असे की छत्रपती मल्टीस्टेट गेवराई येथे अकरा लाख रुपये. अडकले असताना,शाखेत वारंवार चेकरा मारून व्याकूळ होऊन मानसिक तणावाखाली आल्याने सुरेश जाधव यांनी छत्रपती मल्टीस्टेट गेवराईच्या गेटला फाशी घेतली, ज्ञानराधा मल्टीस्टेट मध्ये पाच लाख रूपये व छत्रपती मल्टीस्टेट मध्ये आकरा लाख रूपये ठेव ठेवल्याने व आता मुलीच्या लग्नासाठी पैश्याची तजबीज व्हायला हवी म्हणून सतत बँकेत वारंवार चेकरा मारत होते. मयत ठेविदार सुरेश जाधव यांनी खळेगाव मधील शेती विकून बँकेत पैसे ठेवले होते.आता मुलीच्या लग्नांसाठी पैश्याची गरज होती.त्यासाठी बँकेत चेकरा मारत होते. रात्री उशीरा बँकेच्या गेटला फाशी घेऊन जीवन संपविले. असल्याची माहिती मिळाली. मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे . तसेच संस्था चालकावर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे