माळेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील दारू व अवैध धंदे बंद करा.
माजलगाव तहसील व पोलीस अधीक्षक कार्यालयावर शेकडो महिलांचा मोर्चा !
माजलगाव, सुनिल थोरात
तालुक्यातील माळेवाडी (सुलतानपूर) येथील ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांचे संसार उध्वस्त करणाऱ्या हद्दीतील अवैद्य दारू व अवैद्य धंदे कायमस्वरूपी बंद करून या धंद्याला प्रोत्साहन देणाऱ्यावर कडक कार्यवाही करण्यासाठी काल गावचे सरपंच जयश्री नरवडे आणि त्यांच्या समवेत शेकडो महिलाचा येथील तहसीलवर मोर्चा धडकला
या परिसरात अवैद्य दारू ,मटका ,गुटखा व जुगार अड्डे बोकाळले असून या धंद्याच्या विळक्यात येथील शेतकरी ,कष्टकरी ,तरुणाई आणि सर्वसामान्य नागरिक अडकत आहे या मुळे घरा घरात भांडण तंटे निर्माण होऊन अनेकांचे संसार उध्वस्त झाले असल्याने या ठिकाणी चे सर्व अवैद्य धंदे तात्काळ बंद करून या सर्वांवर कडक कार्यवाही करावी अशी मागणी घेऊन काल दि ४ रोजी दुपारी १ वा माळेवाडी (सुलतानपूर) येथील सरपंच जयश्री नरवडे यांच्या सह गावातील संजना लोखंडे, आशाताई लोखडे, उर्मिला नावडकर , कौशल्या नावडकर, कुशीवर्ता नरवडे, साईत्रा नावडकर, अनिता लोखंडे, , रंजना,मोरे,जयश्री तौर,गिता नरवडे,लता तौर, सुनिता भागवत ढगे (उप सरपंच), रमहानंदा राऊत, अरुणा थोरात, रुक्मिण ढगे, कालींदा ढगे, ज्योती नाईकनवरे , विजयमाला लोखंडे, सागर बाई लोखंडे,गोदाबाई लोखंडे, मनिषा पंडित,रुमन लोखडे, कमल मोरे, तुळसाबाई मोरे, सिताबाई लोखंडे, मुक्ताबाई लोखंडे,मुक्ताबाई लोखंडे,कमल लोखंडे,राधा खरात, चुतुराबाई लोखंडे,निता ढगे, अनिता नावडकर, आशाबाई लोखंडे,सुमन नावडकर, अंजना लोखंडे,कौसाबाई खेत्री , केसाबाई थोरात, मंगल नरवडे राजकन्या ठाकूरआदी महिलांनी घोषणा देत संबंधीत मागण्याचे निवेदन दिले
आता सर्व अवैद्य धंदे मुळासगट बंद केल्या शिवाय आम्ही स्वस्त बसणार नाहीत आम्ही दोन दिवसापूर्वी बीड चे एस पी यांना ही याच संदर्भात निवेदन दिले आहे आम्ही कायम पाट पुरावा करत राहू वेळ प्रसंगी आमचे हे आंदोलन आणखीन तीव्र करू असे या गावाच्या प्रथम नागरी तथा सरपंच सौ जयश्री संजय नरवडे यांनी प्रतिनिधी शी बोलताना सांगितले.