स्थानिक गुन्हे शाखेच्या जगार अड्यांवर कारवाईचा धडाका..
बीड प्रतिनिधी – बीड जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नवनित काँवत यांनी बीड जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यापासुन 100% अवैध धंदे बंद करण्याचे धोरण राबवीले आहे. त्याचबाबत सर्व पोलीस स्टेशनसह स्थानिक गुन्हे शाखेस कारवाया करण्याचे आदेशीत केलेले आहे.
त्याअनुषंगाने आज दिनांक 22/02/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास गुप्त बातमीदारामर्फत माहीती मिळाली की, कळसंबर येथे मेड देविच्या यात्रेमध्ये सभा मंडपाच्या समोरील वडाच्या झाडाखाली काही इसम हे बेकायदेशीररित्या चित्रावर पैसे लावुन गुडगुडी नावाचा जुगार खेळत आहेत व खेळवीत आहेत. मिळालेल्या माहीतीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी दुपारी 12:45 वा.च्या सुमारास छापा टाकला असता त्याठिकाणी असलेले 1) बन्सी पांडुरंग नाईकवाडे रा. घागरवाडा ता. धारुर 2) बाळु शिवाजी भिसे रा. फकीर जवळा ता. धारुर यांना ताब्यात घेवुन त्यांच्या ताब्यातुन रोख रक्कम व जुगाराचे साहीत्य असा एकुण 11800/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी व जप्त मुद्देमाल पोलीस स्टेशनच्या ताब्यात देवुन त्यांचेविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर सदर पथकस गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, कळसंबर येथे मेड देविच्या यात्रेमध्ये हनुमान मंदीर परीसरात काही इसम हे बेकायदेशीररित्या चित्रावर पैसे लावुन सोरट नावाचा जुगार खेळत आहेत व खेळवीत आहेत. मिळालेल्या माहीतीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी दुपारी 13:45 वा.च्या सुमारास छापा टाकला असता त्याठिकाणी असलेले 1) अजय लक्ष्मण पाईक रा. दिंद्रुड ता. माजलगांव 2) जालींदर सुखदेव शेळके रा. जयभिमनगर, माजलगांव यांना ताब्यात घेवुन त्यांच्या ताब्यातुन रोख रक्कम व जुगाराचे साहीत्य असा एकुण 5910/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी व जप्त मुद्देमाल पोलीस स्टेशनच्या ताब्यात देवुन त्यांचेविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापुढेही अवैध धंद्यांवर कारवाया सुरुच राहणार असुन नागरीकांना अवैध धंद्यांबाबत माहीती द्यायची असल्यास त्यांनी QR Code स्कॅन करुन माहीती
द्यावी. माहीती देणाराचे नाव, ओळख व मोबाईल क्रमांक गुप्त ठेवले जाईल. सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक श्री. नवनित काँवत (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक श्री.
सचिन पांडकर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, पोलीस निरीक्षक श्री. उस्मान शेख स्था.गु.शा. यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. श्रीराम खटावकर, पोहवा/1609 दुबाले, पोह/732 दिपक खांडेकर, पोना/1302 सोमनाथ गायकवाड, पोकॉ/438 यादव, चापोकॉ/2062 मांजरे यांनी केली आहे.