श्री संत गजानन महाराज प्रगट दिन बीड शहरांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा
बीड प्रतिनिधी.
श्री संत शिरोमणी श्री शेगाव निवासी श्री संत श्री गजानन महाराज यांचा जन्मोत्सव आज बीड शहरांमध्ये नव्हे तर अख्या जगभरामध्ये सर्वत्र गजानन भक्तांच्या वतीने साजरा करण्यात आला याच पार्श्वभूमीवर बीड शहरातील नामांकित असलेले संयोग नगर भागातील श्री संत शिरोमणी गजानन महाराज यांचे दिवे भव्य असे मंदिर या मंदिरामध्ये श्रीच्या मूर्तीचा रुद्राभिषेक करून विधीवत वेदमंत्राच्या जयघोषात महापूजन करून श्री गजानन महाराजांचा जन्म प्रगट दिन मोठ्या उत्साहात भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला यावेळी मोठ्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन देखील या ठिकाणी मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले होते तसेच गजानन महाराजांचे महापूजन संपन्न झाल्यानंतर सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे आयोजन देखील या ठिकाणी मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले होते बीड शहरातील सर्व भाविक भक्तांनी श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन महाप्रसादाचे सेवन केले आणि हा आनंद उत्सव मोठ्या उत्साहात साजरा व संपन्न झाला .