गेवराईत शिवशाही महानाट्य पाहण्यास गर्दी उसळली
=================
*आ. विजयसिंह पंडित यांच्या तगड्या नियोजनात शिवजन्मोत्सव सोहळा साजरा*
===========
गेवराई दि.१९(प्रतिनिधी) गेवराई शहरात आ. विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली शारदा प्रतिष्ठान आणि राष्ट्रवादी सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यात सायंकाळी ऐतिहासिक शिवशाही महानाट्याचा पहिला शो दिमाखात सुरु झाला. यावेळी शहाजीराजे आणि शिवरायांचा इतिहास डोळ्यात साठविण्यासाठी गेवराई शहरासह विधानसभा मतदारसंघाती नागरिकांनी उत्स्फूर्त गर्दी केली होती. आ.विजयसिंह पंडित यांच्या तगड्या नियोजनात महानाट्याच्या शुभारंभासह शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश पाठक, माजी मंत्री शिवाजीराव (दादा ) पंडित, माजी आमदार विलासराव खरात, धाराशिव येथील एनईपी शुगरचे नानासाहेब पाटील, तहसिलदार संदिप खोमने,
अभिनेते प्रकाश धोत्रे, महेश कोकाटे, डॉ. राजेश आहेर, रमेश रोकडे, दिग्दर्शक महेंद्र महाडिक यांच्यासह समितीचे अध्यक्ष शैलेश तोष्णीवाल, कार्याध्यक्ष संदिप मडके, युवानेते रणविर पंडित यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन, शस्त्रपुजन, मुख्य रंगमंच पुजन, अश्वपुजन आणि श्री गणेशाची आरती करुन महानाट्याच्या शुभारंभ शोला प्रारंभ झाला.
*छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारसामान्य माणसापर्यंत नेण्याचे काम विजयसिंह पंडित यांनी केले — जिल्हाधिकारी अविनाश पाठक*
=================
आ. विजयसिंह पंडित यांनी शिवजन्मोत्सव सोहळा व महानाट्याचे सातत्याने यशस्वी आयोजन करुन शिवाजीमहाराजांचे विचार सामान्य माणसापर्यंत घेऊन जाण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. राजा कसा असावा याचा आदर्श पुढच्या पिढीला कळावा हाच उद्देश त्यांचा आहे. गेवराई विधानसभा मतदारसंघात यामुळे उत्कृष्ट वातावरण तयार झाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
*गेवराई शहरात शिवरायांचे स्मारक तसेच अश्वारूढ पुतळा उभारणार—आ. विजयसिंह पंडित*
=================
यावेळी बोलताना आ. विजयसिंह पंडित म्हणाले की, शिवरायांचे आठवावे रुप, आठवावा प्रताप यासाठी या महानाट्याचे आयोजन केले आहे. शिवरायांचा इतिहास पुढील पीढीला सांगण्यासाठी हा शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित केला जातो. येणाऱ्या काळात शिवरायांचे स्मारक आणि अश्वारुढ पुतळा गेवराई शहरात उभारला जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. शिवजन्मोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित शिवशाही या एैतिहासिक महानाट्याचा तीन प्रयोग शिवजन्मोत्सवानिमित्त विनामुल्य आयोजन करण्यात आले आहे. शुभारंभाचा पहिला प्रयोग सर्वांसाठी असुन गुरुवार दि. २० रोजीचा प्रयोग केवळ महिलांसाठी आणि शुक्रवार दि. २१ रोजीचा प्रयोग शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला असल्याचे सांगून सर्व
शोचा आनंद सर्वांनी घ्यावा असे आवाहन विजयसिंह पंडित यांनी यावेळी केले.
*नेत्रदीपक रंगमंचावर ऐतिहासिक प्रसंगांनी उपस्थित रसिक भारावले*
================
पाच मजली किल्ल्याची हुबेहुब प्रतिकृती, शोभीवंत सिंहासन मेघडंबरी, जहाजाचा वापर करुन महाराजांच्या कोकण मोहिमेचा जिवंत देखावा, भव्य राज्याभिषेक सोहळा, शिवकालीन शस्त्रास्त्रे व युद्ध साहित्य यासह अधुनिक ध्वनी व प्रकाश योजना, घोडे, बैलगाडी, पालखी, नेत्रदिपक अतिषबाजी यांचा वापर करुन मराठा व पातशाही यांच्या तलवारींचा खणखणाट, तोफांचा गडगडाट, अग्नीबाणांचा वर्षाव असा घनघोर रणसंग्राम पाहून उपस्थित रसिक आणि शिवप्रेमी नागरिक भारावले
*बाजारतळ येथे शिवरायांना अभिवादन*
==============
राष्ट्रवादी सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती व नगर परिषद, गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी गेवराई शहरातील बाजार तळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज बाल उद्यानाचे लोकार्पण भवानी अर्बन बँकेचे अध्यक्ष बप्पासाहेब मोटे यांच्या शुभहस्ते तर आ. विजयसिंह पंडित यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले. यावेळी जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अमरसिंह पंडित, शारदा स्पोर्ट्स ॲकडमीचे अध्यक्ष रणवीर पंडित, राष्ट्रवादी सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळ्याचे अध्यक्ष शैलेश तोष्णीवाल, कार्याध्यक्ष संदिप मडके, सहकार्याध्यक्षप्पदी संतोष सुतार, उपाध्यक्षपदी अँड मनोज हजारे, स्वप्निल मोटे, अमजद शेख, बंटी सौंदरमल
सचिवपदी राहुल मस्के, सहसचिवपदी शहादेव निकम, कोषाध्यक्षपदी पप्पू पठाण, सह कोषाध्यक्षपदी रणजित घुंबार्डे यांची तर कार्यकारणी सदस्य म्हणून प्रभाकर भालशंकर, प्रदीप सुतार, धीरज गळगुंडे, मयूर गव्हाणे, वसीम फारोकी, सुभाष गुंजाळ, जयसिंग माने, अशोक बेद्रे, संजय दाभाडे, कमलाकर हातागळे, सादिक शेख, विशाल हुंबे, मोहसीन बागवान यांच्यासह शिवप्रेमी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.