26.1 C
New York
Tuesday, July 1, 2025

Buy now

spot_img
spot_img

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षामध्ये बीड विधानसभेत बंडखोरी…!

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षामध्ये बीड विधानसभेत बंडखोरी…!

बीड (प्रतिनिधी)राष्ट्रवादी काँग्रेस शप पक्षाचे भटके विमुक्त विभागचे जिल्हा कार्याध्यक्ष दीपक चौगुले यांनी बीड विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी दाखल करायच्या शेवटच्या दिवशी यांनी हा अर्ज दाखल केला. पुण्यामध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या होत्या, त्या मुलाखती खुद्द पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेबांनी घेतल्या होत्या, बीड विधानसभेचे वर्तमान आमदार संदीप भैया शिरसागर हे मुलाखती दिवशी गैरहजर होते. मुलाखत न देताच त्यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या दीपक चौगुले यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला.

लोकशाहीमध्ये आणि लोकशाही मानणाऱ्या पक्षांमध्ये समान संधीचे पालन व्हायला पाहिजे होते, परंतु तसे न होता, पक्षाची उमेदवारी संदर्भात निहित प्रक्रिया पार न पाडता. उमेदवारी जाहीर करणे, हे पक्ष शिस्तीच्या विरोधातच आहे असे म्हणावे लागेल.

परळी मध्ये अचानक पणे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारी मिळते, माजलगाव मध्ये दुसऱ्या पक्षातील लोकांना उमेदवारी मिळते. तर बीडमध्ये मुलाखत न देणाऱ्या उमेदवाराला उमेदवारी मिळते. हा सर्व प्रकार संतापजनक आहे. अशी प्रतिक्रिया दीपक चौगुले यांनी व्यक्त केली..

भटक्या विमुक्तांचा आवाज विधानसभेत जाणे आवश्यक आहे, त्यामुळे मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अशी प्रतिक्रिया दीपक चौगुले यांनी व्यक्त केली

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या