- बीड (प्रतिनिधी) मा.पोलीस अधीक्षक साहेब बीड यांनी मोटार सायकल चोरीचे जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिलेले आहे. त्यावरून मा.पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा.बीड यांनी मोटार सायकल चोरी करणारे आरोपींची माहिती काढुन गुन्हे उघडकीस आणण्यासाठी अधिपत्याखालील अधिकारी यांना योग्य मार्गदर्शन करून आदेश दिलेले आहेत. त्याअनुषंगाने पो.स्टे.पेठ बीड गुरनं 183/2024 क.303(2) BNS या गुन्हयातील बुलेट चोरीचा तपास करीत असतांना दिनांक 19/10/2024 रोजी पोलीस पोउपनि श्री. सिध्देश्वर मुरकूटे यांना सदर बुलेट समर्थ विनोद काळे रा.चंदन आरकेड छ.संभाजीनगर याने चोरल्याची गोपनिय माहिती मिळाली तेव्हा तात्काळ मा.पोलीस निरीक्षक श्री.उस्मान शेख स्था.गु.शा.यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक रवाना होवुन आरोपी नामे समर्थ विनोद काळे वय23 रा. चंदन आरकेड छ.संभाजीनगर यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन गुन्हयात चोरीस गेलेली मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे. तसेच त्याचेजवळ आणखीन एक मोटार सायकल सायकल मिळुन आली तपास केला असता सदर मो.सा. पो.स्टे.शिवाजीनगर(मुंबई शहर) गुरनं 324/2022 कलम 379 भादंवि मधील चोरीची असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
आरोपीकडुन आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असुन आरोपी व दोन मोटार सायकल असा एकुण 1,40,000/- चा मुद्देमाल जप्त केले आहे.आरोपीस पो.स्टे. पे बीड यांचे ताब्यात देण्यात आलेले असुन पुढील तपास पो.स्टे.पेठ बीड करीत आहेत.
सदरची कामगिरी मा.श्री. अविनाश बारगळ पोलीस अधीक्षक,बीड , मा.श्री. सचिन पांडकर अपर पोलीस अधीक्षक बीड, श्री. उस्मान शेख पोलीस निरीक्षक स्था.गु.शा.बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि श्री. सिध्देश्वर मुरकूटे, सफौ/तुळशीराम जगताप, पोह/मनोज वाघ, कैलास ठोंबरे, राहुल शिंदे, विकास वाघमारे यांनी केली आहे.