9.6 C
New York
Monday, November 25, 2024

Buy now

spot_img
spot_img

 मी विधानसभा निवडणूक लढणार आणि लढणारच, हे अंतिम सत्य- अनिलदादा जगताप

दि. 22 पासून अनिलदादा जगताप यांच्या प्रचार दौऱ्याला प्रारंभ; बीड मतदार संघातील कुटुंबियांच्या घेणार भेटीबीड, प्रतिनिधी- विधानसभा निवडणुकांच्या रनधुमाळी सुरु झाल्या आहेत. बीड मतदार संघात सध्या अनिलदादा जगताप यांना मोठया प्रमाणात पसंती देण्यात येत असून अनिलदादा यांच्या प्रचार दौऱ्याची उत्सुकता शिगेला पोहचली असल्याचे दिसून येत आहे. अनिलदादा जगताप यांचे समर्थक, सहकारी, कार्यकर्ते देखील मोठ्या उत्साहात प्रचार दौऱ्याचे नियोजन करून आहेत. अनेक वर्षांपासून जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र तत्पर असणाऱ्या अनिलदादांना दादा तुम्ही आमदार व्हा, अशी आर्तहाक बीडकर देत आहेत. याच आर्तहाकेला ओ देऊन अनिलदादा जगताप महाराष्ट्राची धाकटी पांढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र नारायण गडाचे दर्शन घेऊन आपल्या प्रचार दौऱ्याचा आरंभ करत आहेत. येत्या मंगळवारी दि. 22 रोजी सकाळी श्री नगद नारायणाचे आशीर्वाद घेऊन अनिलदादा जगताप नवगण राजुरी सर्कलमधील सर्व गावांना भेटी देणार आहेत. यानंतर दुसऱ्या सत्रात बीड शहरातील काही प्रभागातील कुटुंबियांच्या भेटी घेणार आहेत. शिवसेना पक्ष जी भूमिका घ्यायची ती भूमिका घेईल. मात्र अनिलदादा यांच्या झंजावताला येणाऱ्या 22 तारखेपासून सुरुवात होत आहे. अनिलदादा जगताप यांनी यापूर्वीही अनेकदा पत्रकार परिषदेत मी विधानसभा निवडणूक लढवणारच आहे, अशी भूमिका स्पष्ट केली होती. पक्षाची भूमिका कोणतीही असो मात्र बीडकरांच्या हितासाठी आणि बीडच्या विकासाचा कायापालट करण्याकरिता कार्यकर्ते आणि जनतेच्या आग्रहास्तव निवडणूक लढणार आहेत व यासाठीचेच पाहिले पाऊल म्हणजे अनिलदादा जगताप आपल्या प्रचार दौऱ्याचा आरंभ नारायण गडापासून करत आहेत. गेल्या सदोतीस वर्षांच्या राजकीय प्रवासात अनिलदादांनी शिवसेना आणि बाळासाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ राहिलेले आहेत व आजही हेच विचार घेऊन अनिलदादा जगताप आपला प्रचार दौरा सुरु करत आहेत. बीड मतदार संघात सध्या अनिलदादा जगताप यांना सर्वोपरी पोषक वातावरण तयार झालेले आहे. आजवर विधानसभा निवडणुकीत अनेकांना संधी दिली. मात्र यावेळी अनिलदादांना संधी देऊ असा सुर बीड मतदार संघात चांगलाच उमठला आहे. अशा परिस्थितीत अनिलदादा जगताप यांच्या प्रचार दौऱ्याला होत असलेला प्रारंभ विजयाची नांदी ठरणारा असणार आहे.बी

बीडची जागा शिवसेनेलाच सुटणार; जनता आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी निवडणुक लढवणार- अनिलदादा जगताप

वर्षानुवर्षे बीडची जागा शिवसेनेची आहे आणि ती शिवसेनेलाच सुटणार आहे. काहीजण या जागेवर अतिक्रमण करत असले तरी ही जागा शिवसेनेची आहे आणि ती शिवसेनेकडेच राहणार यात तिळमात्र शंका नाही. जनता आणि कार्यकर्ते यांच्या आग्रह आणि प्रबळ असणारी इच्छा लक्षात घेऊन मी निवडणूक कुठल्याही परिस्थितीत लढणार असल्याचे अनिलदादा जगताप यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हंटले आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या