◼️शास्त्री चौक गेवराई या ठिकाणी बक्षीस वितरण सोहळ्या संपन्न
गेवराई, महाराष्ट्र आरंभ वृत्त : महाराष्ट्र नवनिर्माण सेना भव्य गौरी गणपती सजावट स्पर्धा 2024 वर्ष 4 थे चे बक्षीस वितरण शनिवार दि.5 रोजी सायंकाळी 7 वाजता अभिनेत्री उर्मिला कानेटकर कोठारे, मनसे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मोटे, भाजप नेत्या संगीताताई धसे, मनसे महिला जिल्हाध्यक्षा आशाताई कुटे यांच्या हस्ते मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात वितरीत करण्यात आले.
महाराष्ट्रात गौरी गणपतीचा सन मोठ्या आनंदात साजरा केला जातो. गौरी व गणपती हा प्रत्येकाच्या घराघरात बसविण्यात येतो. या दरम्यान आपल्या घरातील गौरी गणपती आकर्षक दिसावा यासाठी त्यांच्या समोर अनेक सजावट व देखावे करण्यात येते. या सनाचा आंनद अनखी द्विगुणित करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने 4 थ्या वर्षी देखील भव्य गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करुन बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली होती. बक्षिसांचे स्वरूप प्रथम क्रमांक पटकावणाऱ्याला 21000 रूपये, व्दितीय क्रमांकाचे 11000 रुपयांचे तर तृतीय क्रमांकास 5000 रूपयांचे बक्षीस या प्रमाणे होते. सर्व स्पर्धकांनी आपल्या घरचा गौरी गणपती चांगला दिसावा यासाठी अनेक प्रकारचे देखावे तयार केले होते. शनिवार दि.5 रोजी सायंकाळी 7 वाजता शास्त्री चौक गेवराई या ठिकाणी स्पर्धेत सहभागी होऊन विजयी झालेल्या स्पर्धेकांचे बक्षीस वितरण काकण फेम अभिनेत्री उर्मिला कोठारे ( कानेटकर) यांच्या व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेमध्ये प्रथम बक्षीस 21000 रुपये आणि सन्मान चिन्ह वंदना बेंडसुरे यांना, व्दितीय बक्षीस 11000 अनिता कळसकर यांना तर तृतीय बक्षीस पल्लवी गोगुले 5000 तसेच स्पर्धक जास्त वाढल्याने वाढवण्यात आलेले चौथे बक्षीस 2000 अनिता खेत्रे, पाचवे बक्षीस वैशाली घाटे 1500 तर सहावे बक्षीस 1000 अंजुश्री मोटे 1000 आणि सन्मान चिन्ह असलेले सातवे बक्षीस भाग्यश्री सोसे आठवे बक्षीस वर्षाताई घुबार्डे नववे बक्षीस किरण दाभाडे यांना देण्यात आले. या कार्यक्रम चे बहारदार सूत्रसंचालन अविनाश माळवदे यांनी केले . तर स्पर्धा चे परीक्षण प्रशांत रुईकर, प्रकाश भुते, विष्णू खेत्रे, अंगुरी खडके, मुनेश्वर मॅडम यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शुभम म्हेत्रे, वैभव गुंजाळ, विकास वानखेडे, सोमनाथ वादे या सह नवनिर्माण गणेश मंडळ च्या सर्व पदाधिकारी नी परिश्रम घेतले.