◼️बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी!
गेवराई महाराष्ट्र आरंभ प्रतिनिधी : बीड जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर व अप्पर पोलीस अधीक्षक बीड यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांना पोलीस ठाणे आष्टी येथील 2020 साली दाखल असलेल्या खुनाच्या गुन्हयातील फरार असलेला आरोपी पकडण्याचे आदेश दिले होते.त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी पोलीस उपनिरीक्षक मुरकुटे यांचे टिमला सदरील फरार असलेला आरोपी पकडण्याची सांगीतले होते. त्याअनुषंगाने पोउपनि/मुरकुटे व पथक फरार आरोपी आंबादास उर्फ पिंटु बर्डे याचा गोपनिय रित्या व कौशल्याने सुगावा घेत होते. त्यांनी आष्टी परीसरात खबऱ्यांना फरार आरोपीचे ठावठिकाणा काढण्या बाबत सांगीतले.
दिनांक 16.07.2024 रोजी मौजे फत्तेवडगांव ता.आष्टी येथे दिनांक 13.07.2020 रोजी गावांतील काही लोकांनी मिळुन चोर समजुन हकीम ईश्वऱ्या भोसले, वय 26 वर्ष रा पुंडी वाहीरा ता.आष्टी यास मारहाण करुन जखमी केले होते उपचारादरम्यान त्याचे मृत्यु झाल्याने पोशि/बंडु किसन दुधाळ यांचे फिर्यादीवरुन दिनांक 13/0/2020 रोजी पोलीस ठाणे आष्टी येथे गु.र.नं 215/2020 कलम 302 व ॲट्रासिटी कायदयाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील फरार आरोपी पिंटु बर्डे हा गुन्हा नोंद झाले पासुन फरार होता. परंतु गुप्तबातमीदार मार्फत माहीती मिळाल्यावरुन सदरील चार वर्षापासुन खुन करुन फरार असलेला आरोपी नामे आंबादास उर्फ पिंटु भाऊसाहेब बर्डे, वय 47 वर्ष, रा काळेवस्ती, फत्तेवडगांव ता.आष्टी यास तो घरासमोर उभा असल्याची बातमीवरुन पकडण्यासाठी गेले असता तो पळुन जावु लागला परंतु गुन्हे शाखेचे पथकाने पाठलाग करुन मोठया शिताफीने पकडले व पोलीस ठाणे आष्टी यांचे ताब्यात दिले आहे.
सदरील कामगिरी ही श्री नंदकुमार ठाकुर,पोलीस अधीक्षक,बीड, श्री सचिनं पांडकर, अपर पोलीस अधीक्षक बीड, याचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/उस्मान शेख, पोउपनि/सिध्देश्वर मुरकुटे, सफौ/तुळशिराम जगताप, पोह/पि.टी चव्हाण, विकास राठोड, राहुल शिंदे, बाळु सानप व चालक नामदेव उगले यांनी केली आहे.