बीडकरांना सुवर्णसंधी;आध्यात्मिक ज्ञानाचे साधक कोणीक डोसी यांचे आज वास्तु विषयावर विशेष मार्गदर्शन
बीड/प्रतिनिधी
जैन दिवाकर आनंद गणेश दरबार”जैन भवन”येथे चातुर्मास निमित्त समाज प्रबोधन करण्यासाठी विराजमान महासतीयाजी कलावतीजी म.सा.प्रज्ञामूर्ती साध्वी डॉ.अक्षयज्योतीजी म.सा.आधी ठाणा 5 यांच्या प्रेरणेने “जैन भवन”येथे विविध सामाजिक, अध्यात्मिक तसेच संस्कारमय कार्यक्रम चालू आहेत, त्याचाच एक भाग म्हणून प्रतिष्ठित फर्ग्युसन महाविद्यालय पुणे व कर्डीक विद्यापीठ इंग्लंडचे माजी विद्यार्थी,अध्यापक ,लेखक अध्यात्मिक उपचारक, अंकशास्त्रज्ञ व वास्तु सल्लागार,इंग्रजी साहित्य घेऊन कला शाखेची पदवी संपादन केलेले ,पत्रकारिता शाखेची तसेच जैन शास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी संपादन करून वास्तुशास्त्रामध्ये सुवर्णपदकासह विद्यावाचस्पती प्राप्त, सुरतचे सर्वश्रेष्ठ वास्तु सल्लागार या पुरस्काराने सन्मानित ,प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय काव्य व लघु चित्रपटांमध्ये सहभाग, उत्साहाने अध्ययन करणारे, प्राचीन आध्यात्मिक ज्ञानाचे साधक कोणीक डोसी ( सुरत )यांचे वास्तु विषयावर विशेष मार्गदर्शन पर व्याख्यान आज रविवार दि. 30 जुलै 2023 रोजी दुपारी 3 ते 4 वाजता “जैन भवन” सुभाष रोड, बीड येथे आयोजित केलेले आहे आपण व आपल्या मित्रपरिवारासह तसेच विविध संघटनेला आपण कल्पना देऊन जास्तीत जास्त उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा,सोबत पेन व वही घेऊन यावे असे आवाहन नितीनचंद्र मानकचंद कोटेचा जैन दिवाकर शिक्षण प्रसारक मंडळ,बीड जैन श्रावक संघ, बीड चातुर्मास कमिटी यांनी केले आहे